नांदेड : धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्यात यावे, यासाठी जिल्ह्याच्या ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे, आरक्षण देण्याला विरोधही होत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींना घेराओ घालण्यात आला. हदगाव : धनगर व हटकर जातीचा आदिवासी समाजामध्ये समावेश करू नये म्हणून हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी तालुका सरपंच संघटना, आदिवासी युवक कल्याण संघटना, अखिल भारतीय आदिवासी विकास, बिरसा ब्रिगेड परिषद आदी संघटनांनी हदगावच्या आमदार कार्यालयात पावसात आ. माधवराव पाटील यांना घेराओ घातला़ धनगर व हटकर जातीला आदिवासी जमातीमध्ये आरक्षण दिल्यास आम्ही सर्व सरपंच व सर्व आदिवासी संघटना काँग्रेससोबत राहणार नाही, असे सरपंच संघटनेचे अध्यक्ष राम मिरासे व डॉ़बळीराम भुरके यांनी आमदारांना ठणकावून सांगितले़ धनगड व धनगर यांच्या संदर्भात कोणताच संबंध नसल्याने धनगर व हटकर या जातीला आदिवासींचा दर्जा मिळूच शकत नाही़ त्यामुळे त्यांचा आदिवासी सूचीमध्ये समावेश करू नये, या मागण्यासाठी घेराव घातला़ यामध्ये डॉ़बळीराम भुरके, राम मिरासे, किशोर सरकुंडे, रामजी वाकोडे, सुभाष जटाळे, अनिल मेटकर, दावजी मिरासे, कृष्णा राठोड, कळपे पाटील आदी उपस्थित होते़ आरक्षणासाठी रास्ता रोकोमाळेगाव : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी माळेगाव यात्रा येथे २७ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ आंदोलनात सभापती रुस्तुमराव धुळगंडे, केरबा धुळगंडे, गोविंद धुळगंडे, मल्हारी धुळगंडे, हणमंत धुळगंडे, सतीश फुगनर, आशिष धुळगंडे, अंतेश्वर फुगनर, प्रल्हाद धुळगंडे, पांडुरंग धुळगंडे, कालिदास डोईफोडे होते़ बिलोली तहसीलवर मोर्चाकुंडलवाडी : धनगर समाजाला अनु. जमातीत आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी ३० जुलै रोजी धनगर समाज आरक्षण हक्क समितीच्या वतीने बिलोली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता हा मोर्चा पं.स. सभापती निवासस्थानापासून निघणार आहे. मोर्चात शंकरराव काळे, प्रभाकर पेंटे, शंकर परसुरे, श्यामराव मजगे, रमेश शिरगीरे, गंगाधर प्यादेकर आदी सहभागी होणार आहेत. निवेदनावर धनगर समाज, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.किनवटमध्ये निवेदन, प्रतिनिवेदनकिनवट : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ जय मल्हार युवा मंचच्या वतीने किनवट तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, तर आदिवासी बचाव कृती समितीच्या वतीने माजी आ. भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी यांना प्रतिनिवेदन देण्यात येऊन आरक्षणाला विरोध करण्यात आला. निवेदनावर माजी आ. केराम यांच्यासह नारायणराव सीडाम, दत्तराम वानोळे, प्रा. विजयकुमार खुपसे, प्रा. किशन मिरासे, डॉ. सुभाष वानोळे, जयवंत वानोळे, विकास कुडमेथे, दत्ता गड्डमवाड, दत्ता लोखंडे, शेषराव ढोले, निळकंठ कातले, गोपीनाथ बुलबुले, दत्ता कऱ्हाळे, जयवंतराव फोले आदींची नावे आहेत. जय मल्हार युवा मंचचे जिल्हाध्यक्ष अमन कुंडगीर व इतर कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवदेनात धनगर समाजाचा अनु. जमातीत समावेश करण्याची मागणी करण्यात आली.(वार्ताहर)
समर्थनार्थ आंदोलने, विरोधात घेराओ
By admin | Updated: July 29, 2014 01:11 IST