शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मुखेडात दारू, मटका अड्ड्यावर धाड

By admin | Updated: July 11, 2017 00:18 IST

नांदेड: पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी मुखेड तालुक्यातील अवैध धंद्यांना लक्ष केले़ पहिल्या दारूच्या कारवाईमध्ये ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी मुखेड तालुक्यातील अवैध धंद्यांना लक्ष केले़ पहिल्या दारूच्या कारवाईमध्ये १७ हजार ४०० रूपयांचा तर दुसऱ्या कारवाईत पाच आरोपीसह ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ विशेष पथकाने दुसऱ्या कारवाई नरसी रस्त्यावरील हॉटेल चंद्रमा येथे केली़ येथून पथकाने एक बुलेट व एक महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पीओ गाडीसह ५ आरोपीना अटक करून ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ त्याचबरोबर मुखेड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकून १५ आरोपीसह ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकास मुखेडातील अवैध दारू आणि मटका अड्ड्यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी धाडसत्र सुरू केले़ यामध्ये मुखेडमधील गंगा लॉजवरील धाडीत मटका खेळत असताना शे़अवेज जिलानी, मुखेड, रमेश कांबळे, होनवडज आणि अलाऊदीन शेख, मारतळा, शे़मियॉ बाशा साहब रा़चांडोळा यांना अटक करून १६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ बद्री शेख या एजंटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर मटक्याच्याच सलग दुसऱ्या धाडीत ५० हजार २५० रुपयांच्या मुद्देमालासह १२ आरोपींना अटक केल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांनी दिली़ आरोपीमध्ये व्यकंट पुजारी, तुकाराम धोतरे, शिवाजी डुमणे, संग्राम पोटफोडे, पिराजी दंडलवार, बापूराव बोडके, गोंविद कराळे, मरीबा दंडलवार, राम जाधव, यल्लपा गुंजाळे, साहेबराव दंडलवाड, नागनाथ लामतुरे या १२ आरोपींना अटक केली आहे़