आशपाक पठाण , लातूरमुलगी शिकली पाहिजे, ती स्वत:च्या पायावर उभी राहिली पाहिजे, अशी जिद्द उराशी बाळगली़ लग्न करून दिले़ तिला दोन मुले आहेत़ तरीही ती शिकावी म्हणून अहमदपूरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रिकचे प्रशिक्षण घेण्यासाठी तिला प्रवेश दिला़ मात्र, संकट काही पिछा सोडेना़ २४ वर्षीय युवतीचा अहमदपुरात आठवडाभरापूर्वी अपघात झाला़ गंभीर जखमी झाल्याने तिला लातूरच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ पण इथे असलेल्या अपुऱ्या सुविधांमुळे मुलीच्या उपचारासाठी आईने मंगळसूत्र विकून खाजगी रूग्णालयात उपचार सुरू केले आहेत़जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथील सिंधुबाई किसन कांबळे यांनी मुलगी शिकून स्वत:च्या पायावर उभी रहावी, यासाठी सुषमा (वय २४) हिला लग्नानंतर दोन मुले झाल्यावर यावर्षी शिक्षणासाठी अहमदपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘इलेक्ट्रिक’साठी प्रवेश दिला़ घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची़ जावई मिस्त्री काम करतात,पण कधी काम लागते कधी नाही, त्यामुळे कुटुंबाचा खर्चही भागविणे कठीण़ ३० जून रोजी अहमदपूरला सुषमाचा अपघात झाला़ ती गंभीर जखमी झाली़ उपचारासाठी तिला लातूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचा निरोप मिळाला़ घाई-घाईत आई सिंधुबाई लातूरला आल्या़ डॉक्टरांनी सिटीस्कॅन करण्याचे सांगितले, त्यासाठी ३ हजारांचा खर्च़ मात्र, तेवढे पैसे जवळ नव्हते़ मुलगी वाचवायची असेल तर दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले़ नातेवाईकांकडून पैसे गोळा केले, खाजगी रूग्णालयात मुलीला अॅडमिट केले़ पण इथला खर्च परवडत नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून डॉक्टरांना विनंती करून दुसरीकडे जाण्याची विनंती सुरू केली आहे़ मात्र, डॉक्टरांनी बिलासाठी दिलासा दिल्याने थांबल्याचे सिंधूबाई कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ मालक अपंग आहेत, त्यांना बोलता येत नाही़ घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे़ लातूरच्या शासकीय सर्वोपचार रूग्णालयात सिटीस्कॅनची मशिन आहे़ पण नेहमीच बंद असते़ त्यामुळे मोठ्या अपेक्षेने आलेल्या रूग्णांना खाजगी रूग्णालयाचा आधार घ्यावा लागतो़ सर्वोपचारमध्ये असलेल्या अपुऱ्या सुविधेमुळेच अनेक रूग्णांना आर्थिक भुुर्दंड सहन करावा लागत आहे़ मंगळवारी रूग्णाच्या नातेवाईकाला खाजगीत जाण्याचा सल्ला येथील डॉक्टरांनी दिल्याने सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ती मुलगी उपचार घेत आहे़ सात दिवस लोटले तरी अद्याप प्रकृती स्थिरावली नाही़ मात्र, डॉ़ हणमंत किनीकर यांनी धीर दिल्याने थांबलो़ आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे सांगितल्यावर डॉक्टरांनी सुट दिल्याचेही सिंधुबाई कांबळे म्हणाल्या़ राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचाराची सुविधा सुरू केली असली, तरी ती मोजक्याच रुग्णालयांत आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णांना योजनांचा फायदाच मिळत नाही.४आयटीआयचे प्राचार्य परांडे म्हणाले, ‘त्या’ विद्यार्थिनीच्या प्रकृतीची चौकशी शिक्षकांनी केली आहे. सोमवारी मी स्वत: दवाखान्यात जाणार आहे.
मंगळसूत्र विकून मुलीला वाचविण्याचा आईचा प्रयत्न !
By admin | Updated: January 6, 2015 01:07 IST