शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आईला जाळलेल्या बापाला भेटण्यास चिमुकल्यांचा नकार

By admin | Updated: July 26, 2016 00:11 IST

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथे पतीने जाळलेल्या शांताबाई जाधव या ३५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथे पतीने जाळलेल्या शांताबाई जाधव या ३५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे चार चिमुकली मुले पोरकी झाली आहेत. विशेष म्हणजे या चिमुकल्यांनी आईला जाळलेल्या आपल्या वडिलांना अंत्यसंस्काराच्या वेळी भेटण्यासही नकार दिला.वडगाव कोल्हाटी येथे राहत असलेल्या अशोक जाधव याने संशयावरून पत्नी शांताबाईला पेटवून दिले. रविवारी मध्यरात्री शांताबाईचा मृत्यू झाला. त्यांना जवळचे कोणी नातेवाईक नसल्याने सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांनी पंचशील महिला बचत गटाच्या मदतीने बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. यावेळी शांताबाईची १० वर्षीय मुलगी राणी व ७ वर्षीय मुलगा दत्तू यांना पोलिसांनी आईचे अखेरचे दर्शन घडविले. आणखी दोन मुली अगदीच लहान आहेत. यावेळी या चिमुकल्यांची अवस्था पाहून पोलिसांसह उपस्थित सर्व मंडळींना गहिवरून आले होते. पत्नीचे शेवटचे दर्शन व मुलांची भेटही नाहीआईच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पोलिसांनी दोन मुलांना आणले होते. पत्नी मृत्यू पावल्याचे समजताच अशोकने पत्नीस बघण्याची व मुलांना भेटण्याची इच्छा पोलिसांकडे व्यक्त केली. वडिलांच्या भेटीविषयी पोलिसांनी मुलांना विचारले असता, आमच्या आईला आमच्या डोळ्यासमोर ज्याने जाळले, त्याला आम्हाला भेटायचे नाही, असे मुलांनी स्पष्टपणे सांगून वडिलांनी व्यक्त केलेली इच्छा धुडकावून लावली. मुलांनी नकार दिल्याने अशोक ला मुलांना भेटणे तर दूरच; पण पत्नीचा शेवटचा चेहरादेखील पाहता आला नाही, असे सपोनि. राजपूत यांनी सांगितले.