शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सासूचा खून; सुनेस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:23 IST

सासू सखूबाईच्या डोक्यात वरवंटा आणि डंबेल्स मारून तिचा खून करणारी सून मंगलाबाई हिला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.बी. गव्हाणे यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला.

ठळक मुद्देपाच हजार रुपये दंड : दोन वर्षांपूर्वीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सासू सखूबाईच्या डोक्यात वरवंटा आणि डंबेल्स मारून तिचा खून करणारी सून मंगलाबाई हिला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.बी. गव्हाणे यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला.वाळूज परिसरातील मनीषानगरमध्ये समाधन महाजन (३७) त्याची पत्नी, आई आणि तीन मुलांसोबत राहत होता. त्यांच्यासोबत पेइंग गेस्ट म्हणून अविनाश पाटीलसुद्धा राहत होता. यावरून सासू आणि सुनेमध्ये कायम भांडणे होत होती. त्यामुळे घरमालकाने खोली खाली करण्यास सांगितले. त्याने वाळूजमध्ये अन्य ठिकाणी खोली भाड्याने घेतली.काही सामान जुन्या घरी राहिल्यामुळे महाजनची आई सखूबाई झोपण्यासाठी तेथे जात होत्या. १ डिसेंबर २०१५ च्या रात्री मंगलाबाई आणि दोन मुले जेवणाचा डबा घेऊन गेल्या. जेवण करून सखूबाई झोपल्यानंतर मंगलबाई रात्री परत तेथे आली. जिन्यात झोपलेल्या सखूबाईच्या डोक्यात वरंवटा व डंबेल्स मारून तिचा खून करून घरी परत गेली. २ डिसेंबर २०१५ रोजी पहाटे जुन्या घराकडील शेजारी गजहंस हा महाजनच्या घरी आला. त्याने घडलेला प्रकार सांगितला.महाजन यांनी जुन्या घराकडे धाव घेतली. जिन्यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सखूबाईला घाटी रुग्णालयात हलविले. वैद्यकीय अधिकाºयांनी सखूबाईला तपासून मृत घोषित केले.महाजनच्या तक्रारीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या पथकाने खुनाचा तपास करून महाजनची पत्नी मंगला हिला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी करण्यात आली असता तिने खून केल्याची कबुली दिली.नऊ साक्षीदारांचे जबाबखटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात अविनाश पाटील यांची साक्ष महत्त्वाची ठरली. मंगलास रात्री गाऊनमध्ये झाकून वस्तू नेत असताना पाहिले असल्याचे त्याने न्यायालयात सांगितले. फिर्यादी समाधान महाजन फितूर झाला. मात्र, न्यायालयाने परिस्थितीजन्य पुरावा आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल ग्राह्य धरून मंगलबाईला खुनाच्या आरोपाखाली वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला.