शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मातेनेच केली चिमुरड्याची हत्या; दुसरा मुलगा नको म्हणून पिंपात बुडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 04:34 IST

क्रूर आईला अटक

चितेगाव (जि. औरंगाबाद) : दहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या मातेनेच त्याची पाण्याच्या पिंपामध्ये बुडवून हत्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी बिडकीन पोलिसांनी क्रूरकर्म्या महिलेला अटक केली आहे. हा मुलगा आवडत नसल्याने त्याला संपविल्याची कबुली तिने पोलिसांना दिली. देविका परमेश्वर एरंडे, असे आरोपी महिलेचे, तर प्रेम मृत चिमुकल्याचे नाव आहे.शनिवारी मध्यरात्री देविकाने बिडकीन पोलिसांना फोन करून तिचा दहा महिन्यांचा मुलगा घरातून हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा श्वान घर आणि अंगणातच घुटमळले. तसेच तक्रारदार मातेच्या चेहºयावर बाळ हरवल्याचे दु:ख दिसत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला होता.पोलिसांना झडतीत घराच्या अंगणात झाकलेल्या पाण्याच्या पिंपामध्ये चिमुकल्या प्रेमचा मृतदेह आढळला. त्यानंतर देविकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तपासात तिने हत्येची कबुली दिली.मुलीसाठी मुलाचा केला खूनपहिल्या मुलानंतर दुसरी मुलगी व्हावी, असे तिला वाटायचे; मात्र दुसरे अपत्यही मुलगाच झाल्याने तिला प्रेम आवडत नव्हता. दोन्ही मुलांचा सांभाळ करणे शक्य नसल्याने देविकाने त्याला पिंपात बुडवले.आधीही हत्येचा प्रयत्न?आठ दिवसांपूर्वी देविका प्रेमसोबत घरी असतानाही तो पाण्याच्या टबमध्ये पडला होता. त्यानंतर त्याला औरंगाबादेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नामुळे त्याचे प्राण वाचले होते. हासुद्धा प्रेमच्या हत्येचा प्रयत्न असल्याचा पोलिसांना संशय होता. तो धागा पकडून पोलिसांनी तिला बोलते केले.