शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आईने किडनी दिल्याने वाचले मुलाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:10 IST

कुंभार पिंपळगाव : तरूण मुलाच्या किडन्या निकामी झाल्याने आपल्या पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी शेवटी आईच पुढे आली. २६ वर्षीय मुलाला ...

कुंभार पिंपळगाव : तरूण मुलाच्या किडन्या निकामी झाल्याने आपल्या पोटच्या गोळ्याला वाचविण्यासाठी शेवटी आईच पुढे आली. २६ वर्षीय मुलाला एक किडनी देऊन आपल्या मुलाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणणाºया आईचे नाव नसीमबी अब्दुल समद देशमुख (५०) आहे. त्यांनी मुलगा महेमूद अब्दुल समद देशमुख (२६) याचा प्राण वाचविला.मुलासाठी जीव धोक्यात घालणा-या आईची असंख्य उदाहरणे आहेत. अशीच एक मातृशक्तीची एक घटना कुंभार पिंपळगावला घडली आहे. आपल्या पोटच्या आणि कमावत्या मुलाची किडन्या निकामी झाल्याचे समजताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली; मात्र मागे हटेल ती आई कसली? नसीमबी यांनी मुलाला किडनी देऊन मातृत्व धर्म पाळला. किडनी बदलण्यासाठी सुमारे १४ ते १५ लाख रू खर्च आला. ११ तारखेला औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. अजय बोरगावकर, डॉ. अभय महाजन, डॉ. शेखर शिराढोणकर पाटील यांनी शस्त्रक्रिया केली.इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय करणारे महेमूद अब्दुल समद देशमुख यांना पाठदुखीचा त्रास वाढल्याने त्यांनी औरंगाबादला खाजगी रुग्णालयात तपासणी केली. तेव्हा दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समजले.ग्रामस्थांची आर्थिक मदतगावातील मनमिळावू व्यक्ती म्हणून मेहमूद देशमुख सर्वपरिचित आहेत. त्यांच्या उपचारासाठी युवकांनी अखंड हरिनाम सप्ताहामधील जमा झालेल्या लोकवर्गणीतून शिल्लक राहिलेली रक्कम महेमूदच्या उपचारासाठी मदत म्हणून दिली. आपल्या गावातील तरुणाच्या शस्त्रक्रियेच्या दिवशी ग्रामस्थांनी मंदिर, मशीद इ. ठिकाणी प्रार्थना केली. धनंजय कंटुले, अंकुश कंटुले, सोनाली कंटुले, अशोक कटुले, अनिल झुंजे, संतोष बोटे, संत सुतावणे, अन्वर पठाण आदींनी आर्थिक मदत केली.