बीड: जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसास सुरुवात झाली आहे. या कालावधीत बीड, वडवणी व अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. बीड तालुक्यात एकूण १०९.४३ मि.मी. तर वडवणी तालुक्यात एकूण १७१ मि.मी व अंबाजोगाई तालुक्यात एकूण १७१.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक कमी पावसाची नोंद गेवराई तालुक्यात झाली आहे. गेवराईत आतापर्यंत एकूण पाऊस ४४.४ मि.मी. पडला आहे. त्यापाठोपाठ शिरुर कासार येथे ३८.९८ तर माजलगावमध्ये ८३.९७ मि.मी. पाऊस पडलेला आहे. आष्टी तालुक्यात आतापर्यंत ६४.३९ तर पाटोद्यात १०३.२५ पाऊस पडला आहे. यामुळे पाटोदा व आष्टी तालुक्यातील शेतकरी काही अंशी सुखावला आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर थोड्या प्रमाणात चांगला पाऊस पडत असल्याने यंदा दुष्काळी संकट नसेल, अशी आशा शेतकऱ्यांसह नागरिक व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात दुष्काळ पडला होता, त्यावेळी पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच पावसाळा सुरू झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर पावसाला सुरुवात झाली आहे. उशिरा आलेल्या पावसाने तहानलेल्या तालुक्याला काहीसा दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)
बीड, वडवणी, अंबाजोगाईत सर्वाधिक पाऊस
By admin | Updated: July 10, 2014 00:57 IST