शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दहावीनंतरच्या शिक्षणात सर्वाधिक पसंती वाणिज्यला

By admin | Updated: June 29, 2014 01:10 IST

औरंगाबाद : दहावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी उपलब्ध होते आणि त्यांना अडचणीही अनुभवास येतात.

औरंगाबाद : दहावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी उपलब्ध होते आणि त्यांना अडचणीही अनुभवास येतात. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी शहराला सर्वाधिक पसंती देताना पारंपरिक शिक्षण शाखेत वाणिज्यला ४१ टक्के कौल दिला आहे. ‘तुम्हाला काय व्हायला आवडेल’ या प्रश्नावर या विद्यार्थ्यांनी शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सनदी अधिकारी टाळून सर्वाधिक पसंती ‘इतर’ पर्यायाला दिली.या पाहणीसाठी औरंगाबाद शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी संपर्क साधण्यात आला होता. अपेक्षेप्रमाणे ८६ टक्के विद्यार्थ्यांनी शहराच्या ठिकाणी शिक्षण घेण्यास पसंती दिली. ५४ मुले व ३० मुलींनी शहरातील, तर शहराबाहेर शिक्षणास १० मुलांनी व ३ मुलींनी पसंती दिली.विज्ञान शाखेला २८ टक्के पसंती मिळाली असताना तंत्रनिकेतनच्या वाट्याला केवळ ४ टक्के व तुम्हाला काय व्हायला आवडेल असे विचारल्यावर केवळ १३ टक्क्यांनी इंजिनिअरिंगची आवड सांगितली. शिक्षण महाग झाल्याचे तर तब्बल ७२ टक्क्यांचे मत आहे. ७२ टक्के विद्यार्थ्यांनी ठरवून महाविद्यालयाची निवड केली असल्यामुळे त्यांना कोठे काय शिकायचे याच्या नियोजनाची जाणीव झाली. अ‍ॅडमिशनसाठी कोणतीही अडचण आली नाही, असा ५५ टक्क्यांचा अनुभव असल्यामुळे महाविद्यालयांनी आपापल्या पातळीवर विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशनला अडचणी येणार नाहीत, अशी व्यवस्था केल्याचे दिसते. शाखा निवडण्यातही केवळ १५ टक्के मुले व मुली आपल्या पालकांवर अवलंबून होत्या. त्यांचे मार्गदर्शन त्यांनी घेतले. ७८ टक्क्यांनी स्वत:हून शाखा निवडून आपण शिक्षणाबाबत स्वतंत्रपणे विचार करतो, असे सिद्ध केले. यात ४९ मुले व २७ मुली होत्या. सनदी अधिकारी होण्याचा विचार १० टक्के विद्यार्थ्यांनी केला व केवळ ३ टक्के वकील होऊ इच्छितात. वकिली हे सर्वाधिक नापसंतीचे क्षेत्र ठरले. व्यावसायिक अभ्यासक्रमाला ७ टक्केच विद्यार्थ्यांची पसंती मिळाली. त्यांच्यापर्यंत या अभ्यासक्रमांची माहिती पोहोचली नसावी, हे सिद्ध करते का? मित्राने सांगितले म्हणून महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्यांचे प्रमाण १२ टक्के आहे. ४७ टक्के विद्यार्थी ‘इतर’ हा पर्याय तुम्हाला काय आवडेल असे विचारल्यावर निवडतात; परंतु त्यांना नेमके काय हे सांगता आलेले नाही.मौजमजा आणि अभ्यासही...महाविद्यालयीन जीवनाविषयी तुमच्या कल्पना काय? यावर मुले व मुली मोकळेपणाने बोलले. त्यांनी स्वप्नपूर्ती, एन्जॉयमेंटसाठी तर काहींनी जीवन मनमोकळेपणाने जगता येते, असेही सांगितले. महाविद्यालयीन जीवनाला करिअरचा महत्त्वाचा टप्पा समजणारे तसेच मौजमजा करताना अभ्यासही करणार असल्याचे ते म्हणतात. महाविद्यालयीन जीवन हे आयुष्य घडविण्याचे माध्यम असून त्यामुळे जीवनाला वळण लागेल, असेही त्यांना वाटते.