औरंगाबाद : ‘केबीसी’च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना रस्त्यावर आणणाऱ्या करोडपती एजंटांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याचे संकेत आहेत. अशा शंभरपेक्षा अधिक एजंटांची यादी पोलिसांकडे उपलब्ध आहे. केबीसीने कमीत कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यभरातील विशेषत: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील हजारो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. गेल्या चार दिवसांत तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ज्या नागरिकांनी केबीसीमध्ये औरंगाबादेतच पैसे जमा केलेले आहेत, अशा नागरिकांच्या तक्रारी घेऊन औरंगाबादेत केबीसीविरुद्ध स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात येणार असल्याचे गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त अविनाश आघाव यांनी सांगितले. औरंगाबादेतील काही नागरिकांनी नाशिकला जाऊन केबीसीमध्ये पैसे भरले आहेत. त्यांना नाशिकला जाऊन गुन्हा नोंदविणे त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांचेच एक पथक गुरुवारी येणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत गुंतवणूकदारांनी तक्रारी घेऊन येण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी केले.
करोडपती एजंट रडारवर
By admin | Updated: July 22, 2014 00:38 IST