शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारापेक्षा जास्त शेतकरी वजनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 6, 2017 23:33 IST

कळंब : तालुक्यातील एकमेव सुरू असलेल्या तुर खरेदी केंद्राचा काटा बारा दिवसापासून बारदाना नसल्याने बंद होता.

कळंब : तालुक्यातील एकमेव सुरू असलेल्या तुर खरेदी केंद्राचा काटा बारा दिवसापासून बारदाना नसल्याने बंद होता.अखेर बुधवारी रात्री कळंब केंद्रावर दोन हजार कट्टे बारदाना पोहचल्याने गुरुवारी पुन्हा खरेदी विक्री केंद्र्रावरील काटा हलला. बाजार समितीने शेतकऱ्यांच्या घेतलेल्या नोंदीनुसार अद्याप दोन हजारापेक्षा जास्त शेतकरी वजनाच्या प्रतीक्षेत असल्याने खरेदी विक्री संघाने आगामी काळात गती वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.कळंब तालुक्यात गत खरीप हंगामात तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. तुरीच्या पिकास पोषक अशा पाऊस पावसाळ्याच्या उत्तरार्धात झाल्याने पिक चांगल्यापैकी बहरले होते. यामुळे प्रतिएकरी उत्पादन समाधानकारक झाले होते. तालुक्यातील खामसवाडी, मोहा,नायगाव, पाडोळी येरमळा, इटकूर, मंगरूळ, शिराढोण आदी भागात तुरीच्या बहराने शेतकऱ्यांत चांगलाच उल्हास आला होता.परंतु, हा आनंद बाजारातील दराच्या घसरणीमुळे औटघटकेचाच ठरला. शासनाने नाफेड व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून हमीभावाने तुर खरेदी करण्यास सुरुवात केली. कळंब येथे यानुसार ५०५० रुपए प्रतिक्विंटल या दराने दोन खरेदी केंद्रे सुरु झाली. खुल्या बाजारात यापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्र्रावर माल घालण्यासाठी गर्दी केली. परंतू, आवश्यक असणारा बारदाना पुरवण्यात मार्केटिंग फेडरेशनला अपयश येवू लागले.यामुळे खरेदी केंद्रावरील खरेदीस वांरवार ब्रेक लागत आला. यातच तालुक्यात शेतकरी कंपन्याच्या महासंघाची सुरु असलेली पाच केंद्रेही अचानक बंद पडली.खामसवाडी सेवा संस्थेचे केंद्रही अचानक बंद झाले. यामुळे तालुका खरेदी विक्री संघाच्या एकाच केंद्रावर सर्व भार येवू लागला.परिणामी गत दोन महिन्यापासुन मापे होत नसल्याने शेतकयांची मोठी हेळसांड होत होती.बारदान्यामुळे बारा दिवस बंदकळंब येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या तुर खरेदी केंद्रास दररोज किमान हजार कट्टे बारदान्याची आवश्यकता आहे. परंतु, याप्रमाणात मार्केट फेडरेशनकडून बारदाना पुरवण्यात येत नव्हता.अखेर २५ मार्चपासुन बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी विक्री संघाचे हे केंद्र्र बंद ठेवावे लागले. बारा दिवसापासुन खेरदी केंद्र्र बंद असल्याने खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्यासह शेतकर्यांनाही हात हलवत बसावे लागले होते.अखेर ५ एप्रिल रोजी मार्केट फेडरेशनने कळंब केंद्र्रास २००० कट्टे बारदाना पुरवला आहे. यातुन आता १००० क्विंटल तुरीची खरेदी होणार आहे. परंतु, पुरवण्यात आलेला हा बारदानाही अत्यल्प असून, आगामी दोन दिवसात पुन्हा बारदान्याचा स्टॉक निरंक होणार असल्याचे सुत्राकडून समजते. (वार्ताहर)