शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आणखी नवीन अकरा महाविद्यालयांची भर

By admin | Updated: September 15, 2014 00:58 IST

औरंगाबाद : उच्चशिक्षण विभागाने राज्यात नवीन ४६ महाविद्यालयांना मंजुरी दिली असून, यातील ११ महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील आहेत.

औरंगाबाद : उच्चशिक्षण विभागाने राज्यात नवीन ४६ महाविद्यालयांना मंजुरी दिली असून, यातील ११ महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील आहेत. यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, नवीन पदवी अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना मंजुरी मिळण्यासाठी शिक्षण संस्थांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार उच्च शिक्षण विभागाने राज्यात ४६ महाविद्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामध्ये विद्यापीठ कार्यक्षेत्रातील औरंगाबाद जिल्ह्यात ८, उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा व भूम तालुक्यातील ईट येथे २ आणि बीड येथे १, अशा ११ नवीन महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. विशेष म्हणजे परवानगी मिळालेली बहुसंख्य महाविद्यालये ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आहेत.शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तेव्हा ही महाविद्यालये पुढील शैक्षणिक वर्षापासूनच सुरू केली जातील. त्याशिवाय या नवीन महाविद्यालयांना पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाचे संलग्नीकरणही मिळेल. तत्पूर्वी, या संस्थांना महाविद्यालयासाठी इमारत, पुरेशा वर्ग खोल्या, विद्युत व्यवस्था, प्रयोगशाळा, ग्रंथालय, स्वच्छतागृह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार आहेत. आता ४०७ महाविद्यालये४डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांची संख्या ३९६ एवढी होती. ४आता नवीन ११ महाविद्यालयांची भर पडल्यामुळे पुढील वर्षी या महाविद्यालयांनी संलग्नीकरणाची सर्व पूर्तता केल्यास संलग्नित महाविद्यालयांची संख्या ४०७ एवढी होईल.