शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्याहून अधिक झाडे जळाली

By admin | Updated: June 9, 2017 00:04 IST

परभणी : गतवर्षी पावसाळ्यात मोठा गाजावाजा करुन लावलेल्या झाडांपैकी अर्ध्याहून अधिक झाडे जळाली

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गतवर्षी पावसाळ्यात मोठा गाजावाजा करुन लावलेल्या झाडांपैकी अर्ध्याहून अधिक झाडे जळाली असल्याचे ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या पाहणीत दिसून आले. राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवड मोहीम राबविली जाते. मागील वर्षी द्विकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत शासनाच्या प्रत्येक विभागाला झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. परंतु, वृक्षारोपणासंदर्भात गांभीर्याने प्रयत्न होत नसल्याचेच दिसत आहे. त्यामुळे पुढे पाठ आणि मागे सपाट अशी परिस्थिती वृक्षारोपणासंदर्भात झाली आहे. परभणी शहरात मागील वर्षी लावलेली झाडे किती जगली, याचे गुरूवारी स्टिंग आॅपरेशन केले असता लावलेल्या झाडांपैकी बहुतांश झाडे जळाल्याचेच दिसून येत आहे. मागील वर्षी १ जुलै रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालय परिसरात वृक्षारोपणाचा मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. तत्कालीन पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरावरील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी या ठिकाणी झाडे लावली. त्यामुळे हा परिसर काही दिवसांनी हिरवागार दिसेल, अशी अपेक्षा होती. परंतु, झाडे तर वाढली नाहीत. त्या जागी गवत मात्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ७ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास या परिसराची पाहणी केली असता हिरवागार होणारा हा परिसर उजाड झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी स्वत: लावलेले झाड देखील जळाले आहे. तसेच वन विभागाचे प्रमुख अधिकारी, महापालिकेचे आयुक्त यांनी लावलेली झाडे या ठिकाणी जळाल्याचे दिसून आले. मागील वर्षी वृक्षारोपण झालेल्या ठिकाणी केवळ लोखंडी ट्री गार्ड वृक्षारोपणाची साक्ष देत आहेत. परंतु, या ट्री गार्डमध्ये झाडच नसल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे वृक्षारोपणाचे काम गाजावाजा करीत होत असले तरी संवर्धनाकडे मात्र पाठ फिरवली जात आहे. परिणामी वृक्षारोपण मोहीम म्हणजे पुढे पाठ मागे सपाट अशी ठरु लागली आहे. जुना पेडगावरोड भागातील झाडांची पाहणी केली असता अनेक झाडे बऱ्यापैकी वाढली असली तरी ८ ते १० झाडे वाळली आहेत. या ठिकाणी प्रत्येक झाडाला ट्री गार्ड लावण्यात आले होते. परंतु, ट्री गार्डच चोरीला गेल्याचे या पाहणीत दिसून आले. अशीच परिस्थिती जेल कॉर्नर ते नानलपेठ रस्त्यावर पहावयास मिळाली. या रस्त्यावरील गटविकास अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर ट्री गार्डसह झाडेही गायब झाल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे वृक्षारोपण मोहिमांवर होणारा खर्च केवळ उदासीनतेमुळे दरवर्षी वाया जात असून परभणी जिल्ह्याचे हरित स्वप्न स्वप्नच राहत आहे.