शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

अधिकमासामुळे यावर्षी २० टक्के गणेशमूर्ती जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 18:49 IST

अधिकमासामुळे गणेशोत्सव यंदा १८ दिवस उशिराने सुरू होत आहे.

ठळक मुद्दे अधिकचे दिवस मिळाल्याने मूर्तिकारांनी २५ टक्के गणेशमूर्ती जास्त तयार केल्या आहेत. लहान-मोठ्या मिळून ३ लाख मूर्ती यंदा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. 

औरंगाबाद : अधिकमासामुळे गणेशोत्सव यंदा १८ दिवस उशिराने सुरू होत आहे. अधिकचे दिवस मिळाल्याने मूर्तिकारांनी २५ टक्के गणेशमूर्ती जास्त तयार केल्या आहेत. लहान-मोठ्या मिळून ३ लाख मूर्ती यंदा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. 

महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपती बाप्पाच्या आगमनाचे भक्तांना वेध लागले आहेत. शहरात प्रत्यक्षात मूर्ती तयार करणारे १५ मूर्तिकार आहेत, तर १०० पेक्षा अधिक कारागीर परिवार आहेत. यात औरंगपुरा, जवाहर कॉलनी, बालाजीनगर, अरिहंतनगर, पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर रोड, मुकुंदवाडी, चिकलठाणा, सिडको-हडको, बेगमपुरा, पडेगाव रोड, वाळूज, पंढरपूर या भागात मूर्तिकार आहेत. सर्वत्र आता मूर्ती रंगविण्याचे काम सुरूआहे.

मोठ्या मूर्तींना पांढरा रंग लावण्यात आला असून, अजून रंगकाम हाती घेण्यात आले नाही. सुमारे हजार लोक या मूर्तिकलेवर उदरनिर्वाह करतात. शहरात दरवर्षी लहान-मोठ्या सुमारे अडीच लाख गणेशमूर्ती तयार होतात. यंदा अधिकमासामुळे मूर्तिकारांना १८ दिवस जास्तीचे मिळाले आहे. यामुळे मागील वर्षीपेक्षा ५० हजार मूर्ती जास्त तयार करण्यात आल्या आहेत. शहरात साडेतीन लाख मूर्र्तींची मागणी असते. बाकीच्या मूर्ती पेण, नगर,अमरावती, चिखली, बुलडाणा आदी भागांतून आणल्या जातात.

पेणहून शाडूमातीच्या मूर्तीही मोठ्या प्रमाणात शहरात येतात. मात्र, शहरातच यंदा जवळपास ५० हजार मूर्ती जास्तीच्या तयार झाल्या आहेत. यामुळे विक्रेते परजिल्ह्यातून मूर्ती आणण्याचे धाडस  करीत नाहीत, येथूनच मूर्ती घेऊन विकण्याकडे विक्रेत्यांचा कल अधिक असल्याचे सध्या दिसून येत आहे, अशी माहिती ज्येष्ठ विक्रेते प्रकाश तांबे यांनीदिली.

जिल्हा परिषद मैदानावर काही मूर्तिकारांनी आपले तंबू ठोकले असून, तिथे मोठ्या मूर्ती बनविल्या जात आहे. मात्र, गुजरातचे चार कारागीर परिवार यंदा आले नाहीत. यामुळे येथे मोठ्या मूर्ती कमी  राहतील, पोळ्यानंतर जि.प.मैदानात स्टॉलवर मूर्ती येतील,अशी माहिती ज्येष्ठ विक्रेते अशोक राठोड यांनी दिली. 

मूर्तींच्या भावात १५ टक्क्यांनी वाढसरकारने गणेशमूर्तीवरील जीएसटी रद्द केला असला तरी प्रत्यक्षात मूर्तीसाठी लागणारे प्लास्टर आॅफ पॅरिस, रंगांच्या किमती वाढल्याने १५ टक्के किमती वाढल्या आहेत. यासंदर्भात गणेश बगले या मूर्तिकाराने सांगितले की, शहरातील पिढीजात मूर्तिकार नवरात्रोत्सव झाल्यानंतर पुढील वर्षीच्या गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्यास सुरुवात करीत असतो. डिसेंबर महिन्यातच सरकारने मूर्तीवरील जीएसटी रद्द केल्याची घोषणा करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. तसेच प्लास्टर आॅफ पॅरिस, रंगावरील जीएसटी कमी होणे आवश्यक आहे. यामुळे किंमती वाढल्या आहेत.