शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चा, आंदोलनाने जिल्हा दणाणला

By admin | Updated: July 16, 2014 01:26 IST

उस्मानाबाद : आरक्षणाच्या मागणीसाठी मल्हार सेना व लिंगायत समाजाने मंगळवारी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़

उस्मानाबाद : आरक्षणाच्या मागणीसाठी मल्हार सेना व लिंगायत समाजाने मंगळवारी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ तर खासगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे़ नगर परिषद कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करीत बेमुदत काम बंदचे हत्यार उपसले आहे़विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागातील वर्ग ३ व ४ चे कर्मचारी तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी आंदोलन केले होते़ तर मंगळवारी मल्हार सेना, लिंगायत समाजानेही रस्त्यावर उतरून आरक्षणाची जोरदार मागणी केली़ उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मल्हार सेनेच्या मोर्चात जिल्हा प्रमुख धनाजी सातपुते, चंद्रकांत बनसोडे, प्रकाश घोडके, विष्णू घोडके, महानंदा पल्ौवान, गजानन पैैलवान, बसवराज भोगे, गणेश सोनटक्के, नंदकिशोर हजारे, गणेश शिंगाडे, आश्रुबा कोळेकर, विाजी गावडे, शंकर वाघे आदी सहभागी झाले होते़ तर लिंगायत समाजाच्या मोर्चात रेवणसिध्द लामतुरे, राजेंद्र मुंडे, गोविंद पाटील, प्रसन्न कथले, अ‍ॅड़शैैलेंद्र यावलकर, अ‍ॅड़नागनाथ कानडे, शंकर कोरे, वैजिनाथ गुळवे, श्रीकांत साखरे, चंदन भडंगे, सुरेंद्र आवटे आदी सहभागी झाले होते़ खासगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या धरणे आंदोलनात सुनील चव्हाण, संजय जाधव, विजयकुमार कदम, व्ही़व्ही़बाजगुळे, एस़जीक़ांबळे, आऱडी़मुळीक, डी़व्ही़बिराजदार, व्ही़एम़मगर, मुजावर आदी सहभागी झाले होते़ तर राज्य नपगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्या पालिकेसमोरील धरणे आंदोलनात संभाजी राजेनिंबाळकर, अमर ताकमोघे, श्रध्दा साळुंके, एस़बी़इंगळे, कल्याण गायकवाड, ज्योतीराम कांबळे आदी सहभागी झाले होते़ भूम येथील पालिका कामगारांच्या संपात न. प. च्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष फारुक इस्माईल पठाण, उपाध्यक्ष महादेव भानुदास शिंदे, सचिव सर्जेराव भोळे, राजाभाऊ कांबळे, गोविंद कुलकर्णी यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले आहेत. भूम येथील लिंगायत समाजाच्या आंदोलनात माजी जि. प. अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, डॉ. शिवशंकर खोले, दीपक खराडे, शिवशंकर सोलापुरे, सूर्यकांत गवळी, सिद्धेश्वर मनगिरे यांच्यासह इतर समाज बांधवांची उपस्थिती होती.उमरगा येथे लिंगायत समाजाच्या मोर्चा आंदोलनात डॉ़एम़एस़मलंग, सिद्रामप्पा चिंचोळे, वैजिनाथ माशाळकर, एम़ओ़पाटील, राजेंद्र पतंगे, नगरसेवक विजय दळगडे, श्रीकांत पतगे, श्रीकांत पतगे, शरणाप्पा येळापुरे, अ‍ॅड़पी़एऩपणुरे, अशोक पतंगे, चंद्रकांत मजगे, महेश माशाळकर, अप्पू दंडगे, युवराज हेबळे, शंकर दंडगे, श्रीशैल व्हंडरे आदी समाज बांधव सहभागी झाले होते़ तर पालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात एम़आऱशेख, शेषेराव भोसले, जहीर फुलारी, बाबूराव जाधव, बाबूराव सुरवसे, एस़एम़सोनवणे, सुरेश भोसले, करबस शिरगुरे, नारायण सोनकांबळे, एस़एम़मोरे, बालाजी जाधव, महानंदा स्वामी, सुशीलाबाई सुरवसे, नागेश कापसे, मंजूर शेख, पुतळाबाई हेळवी, अमर करंजकर यांच्यासह आदींनी सहभाग नोंदविला होता. (वार्ताहर)अतिरिक्त शिक्षकअतिरिक्त शिक्षकांचे जोपर्यंत शासन समायोजन करीत नाही तोपर्यंत त्यांचा वेतन चालू ठेवावा, ज्या अतिरिक्त शिक्षकांना समायोजनाचे आदेश दिलेले नाहीत त्यांना ते तत्काळ द्यावेत, जिल्हा ठाणे येथील अतिरिक्त शिक्षकांच्या ज्या आदेशाप्रमाणे वेतन चालू ठेवण्यात आले आहे, त्या धर्तीवर वेतन चालू ठेवावे, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून देय असलेला पहिला हप्ता नियमाप्रमाणे द्यावा, ज्या अतिरिक्त शिक्षकांना शाळेत समायोजन करून घेत नाहीत अशा संस्था चालकांवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़लिंगायत समाजलिंगायत समाजातील ज्यांना आरक्षण आहे त्यांचे आरक्षण कायम ठेवून इतर संपूर्ण लिंगायत समाजास ओबीसीचा दर्जा मिळावा, लिंगायत समाजास महाराष्ट्रात लोकसंख्येवर आधारित अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, लिंगायत समाजास अल्प संख्याक दर्जा मिळण्याकरिता केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात यावी, आदी विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवार यांनी आश्वासन दिलेले असताना अद्याप मागण्या मान्य न झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे़नगर परिषद कर्मचारीराज्यातील नगर पालिका, नगर पंचायत कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे १०० टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे द्यावे, २७ मार्च २००० पूर्वी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना विनाअट सेवेत कायम करावे, १९९३ पूर्वी कायम झालेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना अनुकंपा धारकाचा व इतर शासकीय सेवेचा लाभ द्यावा, अनुकंपा धारकाची स्थायी नेमणूक आदी १९ मागण्या करण्यात आल्या आहेत़मल्हार सेनाराज्य शासनाच्या ग्रामपंचायत अ‍ॅक्ट १९५१ मागासवर्गीय कोर्ट फी स्टँप फी मध्ये सवलती देण्यासंदर्भात सन १९९६ पासून प्रकाशित केलेल्या राजपत्रात, जनजाती मंत्रालयाकडून सन २००७-०८ पासूनच्या अहवाल इंग्रजीत अनुसूचित जातीच्या यादीत इंग्रजी प्रतीत क्ऱ२६ वर असून, धनगर व देवनागरी लिपीतील प्रतीत क्रमांक ३६ वर धनगर असा उल्लेख आहे़ त्यामुळे वर्षानुवर्षे होत असलेली मागणी मान्य करून राज्यातील धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या सर्व सवलती लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे़