शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासाठी देखरेख समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 19:41 IST

नैसर्गिक परिस्थितीमुळे अथवा अन्य कारणामुळे निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आता जिल्ह्यात दुष्काळ देखरेख समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती प्रत्येक आठवड्यात परिस्थितीचे मूल्यांकन करुन त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नैसर्गिक परिस्थितीमुळे अथवा अन्य कारणामुळे निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी आता जिल्ह्यात दुष्काळ देखरेख समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती प्रत्येक आठवड्यात परिस्थितीचे मूल्यांकन करुन त्याचा अहवाल राज्य शासनाला पाठविणार आहे.निसर्गाच्या अवकृपेमुळे राज्यात मागील काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. याचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसतो. दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करताना अनेक वेळा आकडेवारीचा गोंधळ निर्माण होत असे़ अशा वेळी दुष्काळाची पारदर्शक परिस्थिती समोर येत नव्हती़ या सर्व परिस्थितीवर उपाय करण्यासाठी राज्य शासनाने आता दुष्काळ देखरेख समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे़ या समितीमध्ये विविध विभागांमधील १२ तज्ज्ञ सदस्यांचा समावेश असेल़ ही समिती प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने मूल्यांकन करणार आहे़ पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक, पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण आदी बाबींचा शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करीत त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे़ त्यानंतर तालुक्यात, गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे का किंवा नाही, या विषयीचे मूल्यांकन करणार आहे़ मूल्यांकनाचा हा अहवाल प्रत्येक आठवड्याला राज्यस्तरीय देखरेख समितीला सादर केला जाणार असून, या अहवालावरूनच दुष्काळाचे मूल्यमापन करून शासन उपाययोजना करणार आहे़दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केल्यामुळे आता दुष्काळ जाहीर करण्याची परिमाने देखील बदलली आहेत़ केवळ पिकांची उत्पादकता हा एकमेव परिमाण न मानता सर्व परिस्थितीचा शास्त्रीय अभ्यास करून दुष्काळाचे मूल्यमापन केले जाणार आहे़ त्यामुळे पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचविण्यास सोयीचे होणार आहे़