शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

सरपंचावर पैशांच्या अपहाराचा ठपका!

By admin | Updated: August 7, 2014 00:16 IST

आखाडा बाळापूर : आश्रमशाळेला पाणीपुरवठा करण्याच्या बदल्यात मिळणारी अधिग्रहणाची पावणेचार लाख रुपयांची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा केली

आखाडा बाळापूर : आश्रमशाळेला पाणीपुरवठा करण्याच्या बदल्यात मिळणारी अधिग्रहणाची पावणेचार लाख रुपयांची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा केली न करता ती परस्पर हडप केल्याचा ठपका एका सरपंचावर ठेवण्यात आला आहे. कळमनुरी पंचायत समितीने नेमलेल्या चौकशी समिती पथकाने कळमनुरी तालुक्यातील बेलथर येथील सरपंचावर ठेवला आहे. कळमनुरी तालुक्यातील गोटेवाडी येथील आदिवासी आश्रमशाळेला सन २००९- २०१३ पर्यंत बेलथर येथील ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा केला आहे. या अधिग्रहणापोटी शाळेने ३ लाख ९२ हजार ८९ रुपये सरपंचास अदा केले होती. ही रक्कम सरपंचाने ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा न करता परस्पर उचलून खर्च केली. या रकमेची व आश्रमशाळेसाठी ठक्कर बापा योजनेंतर्गत मिळालेल्या साडेपाच लाख रुपयांच्या विहिरीची घोषणा बेलथर येथील माजी ग्रा. पं. सदस्य राजू पाईकराव याने माहिती अधिकारांतर्गत उघड केली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी पं. स. समोर ३ जून रोजी उपोषण केले होते. तेव्हा बीडीओंनी विस्तार अधिकारी एस. टी. खंदारे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. त्यात ९ जुलै रोजी सरपंच व ग्रामसेवक यांना पाणी अधिग्रहणाच्या ३ लाख ९२ हजार ८९ रुपये खर्चाची कारणे दाखवा नोटीस बजावली. ग्रामसेवकांनी सदर रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमाच झाली नसल्याने सचिव म्हणून खर्च करण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले. तर ही रक्कम नाली बांधकामावर सरपंचाने खर्च केल्याचे सादर केलेल्या खुलाशात म्हटले आहे; परंतु हा खर्च कायदेशीर बाबीत बसत नसल्याने आपणास ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३९ प्रमाणे पदावरून बडतर्फ का करण्यात येऊ नये? असे चौकशी अधिकाऱ्याने बजावले आहे. दुसरीकडे ठक्करबापा योजनेंतर्गत मिळालेली विहिरच गायब झाल्याने ग्रामसेवक, अभियंते, कंत्राटदार, गटविकास अधिकारी या बड्यांची साखळीच आता गळाला लागणार असल्याने मागील दोन महिन्यांपासून चौकशी थंडबस्त्यात आहे. या विहिरीचीही चौकशी करण्याची मागणी असताना चौकशी करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. ग्रामस्थांमध्ये चर्चापाईकराव यांनी माजी सरपंचाला सोडून विद्यमान सरपंचाच्याच कार्यकाळाची चौकशीसाठी उपोषण केले. मागील आठ ते नऊ वर्षांपासून परस्पर पैसे उचलून दोन्ही सरपंचांनी खर्च केले आहेत. त्यांच्या कार्यकाळाची चौकशीही व्हावी, अशी मागणी आहे. रक्कम परस्पर उचलून बेकायदेशीर खर्च केल्याने सरपंचाच्या अपात्रतेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविणार आहे. विहिरीविषयीचे प्रकरण उपअभियंत्याकडे पाठवले आहे. - एस.टी. खंदारे, चौकशी अधिकारी कळमनुरी.उचललेली रक्कम बेलथरच्या विकास कामांसाठी खर्च केली आहे. त्यामध्ये नालीचे बांधकाम केले आहे. त्या कामात कुठल्याही प्रकारचा अपहार केलेला नाही. - रामराव खंदारे, सरपंच, बेलथर, ता. कळमनुरी