शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पैशासाठी मजूराला डांबले, अपहरणकर्त्यास अटक

By admin | Updated: April 27, 2017 21:41 IST

मजुराचे अपहरण करुन जिंतूर तालुक्यातील एका घरात त्यांना डांबून ठेवून पैशाची मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्यास मुकुंदवाडी

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 27 -  मजुराचे अपहरण करुन जिंतूर तालुक्यातील एका घरात त्यांना डांबून ठेवून पैशाची मागणी करणाऱ्या अपहरणकर्त्यास मुकुंदवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफिने पकडले आणि मजूराची सुटका केली. विष्णू ससे (३२,रा. पाचोरा, ता. जिंतूर, जि. परभणी) असे आरोपीचे नाव आहे. ऋषिकेश देशमुख हे औरंगाबादेतील जयभवानीनगर येथे पत्नी आणि मुलांसह राहतात. ते मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. आरोपी आणि तक्रारदार एकाच तालुक्यातील असल्याने ते एकमेकांच्या परिचयाचे आहेत. त्यांच्यात आर्थिक व्यवहारही होत असत. दोन ते तीन वर्षापूर्वी ऋ षिकेश यांनी तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपये उसने घेतले होते. आर्थिक अडचणीमुळे ते आरोपीला रक्कम परत करू शकले नाही. आरोपीकडून मात्र त्यांच्याकडे पैशासाठी सारखा तगादा सुरू होता. दरम्यान २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आरोपी ससे देशमुखच्या घरी गेला. चहा पिऊन येऊ, असे म्हणून देशमुख यांना तो सोबत घेऊन गेला. देशमुख यांना सोबत घेऊन तो चक्क गावी गेला. तेथील एका शेतातील घरात त्याने देशमुख यांना डांबून ठेवून जबर मारहाण केली. जोपर्यंत पाच लाख रुपये देत नाही, तोपर्यंत तुझी सुटका होणार नाही, असा दम आरोपींनी दिला. ससेसोबत गेलेला पती घरी न परतल्याने त्यांची पत्नी चिंतीत होती. पैशाची व्यवस्था करण्याच्या बहाण्याने देशमुख यांनी २५ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पत्नी शालिनी यांच्याशी संपर्क साधला. पैशासाठी ससेने मारहाण करून गावातील एका घरात डांबून ठेवल्याचे देशमुख यांनी पत्नीला सांगितले. ही बाब समजल्यानंतर शालिनी यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आरोपी ससेविरूद्ध तक्रार नोंदविली.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त माणिक बाखरे, पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बनसोड, कर्मचारी विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, वाहनचालक खरात, गुन्हेशाखेचे संदीप पाटील आणि भोसले यांनी बुधवारी सायंकाळी आरोपीचे गाव गाठून तेथे त्याचा शोध सुरू केला. चौकटअमिषाने अडकला जाळ्यातआरोपीला पकडण्यासाठी उपनिरीक्षक बनसोड यांनी जिंतूर पोलिसांच्या मदतीने आरोपीला दोन ते अडिच लाख रुपयांत तडजोड करून देशमुखची सुटका करण्याची तयारी त्यांच्या पत्नीची असल्याचे कळविले. त्यानंतर आरोपी ससे देशमुख यांना घेऊन आला. देशमुख सुखरुप असल्याचे पाहताच पोलिसांनी आरोपीला पकडले.