शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 18:25 IST

२१ जानेवारीपासून प्रत्यक्ष रस्त्यांवर सिमेंट पडण्यास सुरुवात होणार आहे. टीव्ही सेंटर ते एन-६ स्मशानभूमीपर्यंतच्या कामाला सुरुवात होईल.

औरंगाबाद : राज्य शासनाने दिलेल्या १०० कोटींच्या अनुदानातून शहरातील ३० मोठे रस्ते सिमेंट पद्धतीने गुळगुळीत करण्यात येणार आहेत. २१ जानेवारीपासून प्रत्यक्ष रस्त्यांवर सिमेंट पडण्यास सुरुवात होणार आहे. टीव्ही सेंटर ते एन-६ स्मशानभूमीपर्यंतच्या कामाला सुरुवात होईल. सिमेंट रस्त्यांसाठी शहरात मोठी वाहने येतील. वाहतूक पोलिसांनी या वाहनांना थांबवून ठेवू नये, अशी मागणी आज कंत्राटदारांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जानेवारी रोजी १०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन टीव्ही सेंटर येथे केले होते. महापालिकेने शहरात कुठेच कामे सुरू न केल्याने सर्वत्र ओरड सुरू झाली होती. १६ जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी कामे कधी सुरू करणार? तारीख सांगा म्हणून प्रशासनाची चांगलीच कोंडी केली होती. शुक्रवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी १०० कोटींची कामे करणाऱ्या विभागातील अधिकारी व कर्मचाºयांसह कंत्राटदारांची बैठक घेतली. बैठकीत कंत्राटदारांनी आम्ही कामे सुरू करण्यास एका पायावर तयार असल्याचे नमूद केले. महापालिका प्रशासनच सहकार्य करीत नसल्याचे सांगण्यात आले. डिफर पेमेंट पद्धतीवर तयार करण्यात आलेल्या जुन्या रस्त्यांवर सिमेंट रस्ते करायचे आहेत. त्यामुळे तेथे माती परीक्षणाची गरज नाही. मनपा अधिकाºयांनी फक्त मार्किंग करून दिली तरी कामे सुरू करता येतील, असे सर्व कंत्राटदारांनी नमूद केले.

वाहतूक पोलिसांची परवानगीसिमेंट रस्ते तयार करताना आरएमसी प्लँटमधून मोठी वाहने निघतात. ही वाहने जेथे काम सुरू आहे, तेथे पोहोचण्यास बºयाच अडचणी येतात. ठिकठिकाणी वाहतूक पोलीस अडवून करतात. या वाहनाला जास्त वेळ उभे करता येत नाही. त्यात सिमेंटचे ओले मटेरियल असते. ते सतत फिरत ठेवावे लागते. थोड्या वेळासाठीही वाहन बंद पडले तर सिमेंट साचून जाते. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त हनुमंत भापकर यांच्यासोबत महापौरांनी चर्चा केली. भापकर यांनी रस्त्यांसाठी वाहन आणण्याची परवानगी देण्यात येईल, असे नमूद केले.

३० अंश तापमानसिमेंट रस्ते तयार करताना कडक उन्हाळा अजिबात चालत नाही. ३० अंशांपेक्षा अधिक तापमानात काम सुरू केल्यास रस्त्याला तडे जाण्याची दाट शक्यता असते. महापालिकेच्या कंत्राटदारांना सध्या थंडी असेपर्यंत दिवसा आणि नंतर रात्री काम करावे लाणगार आहे. थंडी असेपर्यंत जास्तीत जास्त कामे करण्यासाठी कंत्राटदारांची धडपड सुरू आहे. 

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकAurangabadऔरंगाबाद