बीड : गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी गोविंद रमेश शिरगुळे यास प्रमुख जिल्हा व सत्र न्या. अशोक भटकर यांनी एक वर्षाची शिक्षा मंगळवारी सुनावली. १६ जानेवारी २०१४ रोजी ती शाळेतून गावी जाण्यासाठी जातेगाव येथील बस स्थानकावर आली होती. त्यावेळी गोविंद शिरगुळे हा तिच्या जवळ गेला. ओरडु नका, गावाकडे जाऊ नका असे म्हणून तिचा हात धरुन ओढू लागला. त्यावेळी तिच्या सोबत असणाऱ्या मैत्रिणिने आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोडवा-सोडव करण्यासाठी शेजारी उभे असलेले त्यांनाही गोविंद याने मध्यस्थांनाही लाथाबुक्क्याने मारहाण केली तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यामुळे त्या मुलीच्या फिर्यादीवरुन तलवाडा ठाण्यात गोविंद शिरगुळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी पक्षाचा पुराव ग्राह्यधरत आरोपी गोविंद रमेश शिरगुळे यास एक वर्षाची शिक्षा व २०० रुपये दंड ठोठावला. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता एन.एन. साबळे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
मुलीचा विनयभंग; एक वर्षाची शिक्षा
By admin | Updated: September 17, 2015 00:32 IST