शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘मोकाटां’चा उपद्रव जीवघेणा

By admin | Updated: August 25, 2016 01:02 IST

हणमंत गायकवाड , लातूर मोकाट जनावरांचा उपद्रव इतका वाढला आहे की, कालच पशुपतिनाथ नगरात एका कटाळ्याने दोघांना गंभीर जखमी केले. मात्र मनपाची कारवाई धीम्या गतीने सुरू आहे.

हणमंत गायकवाड , लातूरमोकाट जनावरांचा उपद्रव इतका वाढला आहे की, कालच पशुपतिनाथ नगरात एका कटाळ्याने दोघांना गंभीर जखमी केले. मात्र मनपाची कारवाई धीम्या गतीने सुरू आहे. बुधवारी ‘लोकमत’ने शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील मोकाट जनावरांची मोजदाद केली असता १३६२ मोकाट जनावरे आढळून आली. त्यांनी रस्तेच अडवून ठेवले होते.शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, शाहू चौक, डॉ. आंबेडकर चौक, विलासराव नगर नांदेड रस्ता, नांदेड नाका पाण्याची टाकी, गरुड चौक, शिवाजी चौक, राजीव गांधी चौक, रेणापूर नाका तसेच गल्लीबोळांतील वर्दळीच्या रस्त्यांवर या मोकाट जनावरांचा ठिय्या होता. वाहतुकीलाच अडथळा होता. या प्रत्येक चौकांत दहा ते पंधरा जनावरांचा ठिय्या होता. मनपाने मात्र बुधवारी केवळ एक जनावर कोंडवाड्यात टाकले. मंगळवारी १० जनावरे अशी एकूण ११ जनावरे कोंडवाड्यात आहेत. ‘लोकमत’ने शहरातील वेगवेगळ्या भागांत जाऊन पाहिले असता १३६२ मोकाट जनावरांचा उपद्रव दिसून आला. प्रकाश नगर येथील सरस्वती शाळेसमोर विद्यार्थी तसेच वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. येथेही सात जनावरांनी रस्ता अडवून ठेवला होता. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. दररोजचीच ही स्थिती आहे. मनपाच्या कारवाईत मात्र गांभीर्य नाही.