भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांवर हे कुत्रे भुंकत आहेत. तसेच नागरिकांच्या कोंबड्या व बकऱ्यांवर झुंडीने हल्ला करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हे कुत्रे कोणीतरी बाहेरील गावाहून येथे आणून सोडल्याचे बोलले जात आहे. अनेक वेळा लहान मुलांवरही हे कुत्रे धावून जात असल्याने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
फोटो : करंजखेड गावात वावरणाऱ्या कुत्र्यांच्या झुंडी दिसत आहेत.