शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नवरा-बायकोमधील वादाला कारणीभूत ‘मोबाइल फोेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:06 IST

मॅडम माझी बायको सतत मोबाइलवर बोलते, माझा नवरा रात्रंदिवस मोबाइलवर चॅटिंग करतो, यामुळे आमच्यात सतत भांडण होत असल्याने आम्ही आता एकत्र राहू शकत नाही, अशा प्रकारच्या सुमारे ८० टक्के तक्रारी रोज पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण मंचात दाखल होतात. यातील ५० टक्के जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळविण्यात पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना यश येते.

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मॅडम माझी बायको सतत मोबाइलवर बोलते, माझा नवरा रात्रंदिवस मोबाइलवर चॅटिंग करतो, यामुळे आमच्यात सतत भांडण होत असल्याने आम्ही आता एकत्र राहू शकत नाही, अशा प्रकारच्या सुमारे ८० टक्के तक्रारी रोज पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण मंचात दाखल होतात. यातील ५० टक्के जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळविण्यात पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना यश येते.याविषयी अधिक माहिती अशी की, लग्न झाल्यानंतर संसार सुरळीत चालावा, यासाठी पती-पत्नीसोबतच सासर आणि माहेरच्या मंडळींची भूमिकाही महत्त्वाची ठरत असते. आजच्या सारखी पूर्वी दळणवळण आणि संपर्काची साधने नव्हती. यामुळे सासरी गेलेल्या विवाहितेला माहेरी निरोप पत्राद्वारेच पाठवावेलागत.दिवाळी, भाऊबीज, रक्षाबंधन अशा सणासाठी ती माहेरी जाई. आता मात्र मोबाइल आणि दळणवळणाच्या साधनांमुळे जग जवळच आले आहे.पती-पत्नीत भांडण जेव्हा विकोपाला जाते तेव्हा प्रकरण पोलिसांच्या दारात पोहोचते. तेव्हा पोलीस ठाण्याचे अधिकारी ही तक्रार महिला तक्रार निवारण मंचाकडे वर्ग करते. जानेवारीपासून आतापर्यंत ११६७ तक्रारी दाखल झाल्या. यापैैकी २३७ जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळविण्यात पोलिसांना यश आले.२०१ जोडप्यांच्या तक्रारी विविध कारणांमुळे निकाली काढल्या, तर १४१ जोडप्यांना पोलीस ठाण्यात तर १३८ जोडप्यांना कोर्टात पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी दिली. तसेच ३७० जोडप्यांचे समुपदेशन सध्या आम्ही करीत आहोत.त्या म्हणाल्या की, पती-पत्नीच्या वादाला कारणीभूत असलेल्या विविध कारणांमध्ये मोबाइल हे प्रमुख कारण म्हणून वेगाने पुढे येऊ लागले. सासरी काही भांडण झाले तर विवाहिता लगेच माहेरी फोन करून सर्वकाही सांगते. यानंतर माहेरच्या मंडळीकडून तिच्या घरात हस्तक्षेप करण्यास सुरुवात होते आणि वाद पोलिसांपर्यंत येतो.संयुक्त कुटुंबात राहून संसार करण्यास अनेक मुली नकार देतात. त्यांना पतीसोबत वेगळे राहायचे असते, तर मुलाला आई-वडिलासोबत. यामुळे पती-पत्नीत भांडण होते, तर एकुलत्या एक मुलाच्या लग्नानंतर त्याच्या आई-वडिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. सून मुलाला आपल्यापासून दूर नेईन असे त्यांना वाटते. त्यांचा सांभाळ करणारी सून त्यांना हवी असते तर सुनेला सासू-सासरे नको असतात. पती-पत्नीपैकी कोणाचेतरी बाहेर अफेअर असणे, हे एक कारण संसार तुटण्यात असते. मोबाइलवर सतत चॅटिंग करण्याच्या कारणातूनही जोडप्यात भांडण होते, असे पोलीस निरीक्षक पाटील म्हणाल्या.