शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल मेकॅनिक आणि किराणा दुकानदाराने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:45 IST

पुंडलिकनगर येथे मोबाइल मेकॅनिकने तर रमानगरात किराणा दुकानदाराने काही तरी कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पुंडलिकनगर येथे मोबाइल मेकॅनिकने तर रमानगरात किराणा दुकानदाराने काही तरी कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी अनुक्रमे पुंडलिकनगर आणि उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.पोलिसांनी सांगितले की, पुंडलिकनगर येथील गल्ली नंबर १ मध्ये संतोष रामदास दारटकर (३५) हा मेकॅनिक असून, तो पैठणगेट येथील एका दुकानात मोबाइल दुरुस्तीचे काम करतो. त्याची पत्नी, मुलगा आणि मुलीसह भाऊबीजनिमित्त माहेरी गेले होते. यामुळे रविवारी रात्री तो घरी एकटाच होता. रात्री केव्हा तरी त्याने राहत्या घरात पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंत तो झोपेतून न उठल्याने शेजाºयांनी खिडकीतून संतोषच्या रूममध्ये डोकावून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईक आणि पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सय्यद आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल एकनाथ चव्हाण, दीपक देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन संतोषला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी संतोषला तपासून मृत घोषित केले. संतोषच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेचा तपास पोहेकॉ. एकनाथ चव्हाण करीत आहेत.रमानगर येथे घडलेल्या अन्य एका घटनेत किराणा दुकानदार कृष्णा तुळशीराम वाहूळ (५०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कृष्णा हे रमानगर येथे किराणा दुकान चालवीत होते. या दुकानाच्या मागील खोली ते राहतात. रविवारी दिवसभर किराणा दुकान चालविल्यानंतर रात्री जेवण करून ते झोपले. सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान उघडले नाही. त्यांनी त्यांच्या बेडरूममध्ये छताच्या लाकडी बल्लीला दोरी बांधून गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर उस्मानपुरा पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पी. एन. शुक्ला करीत आहेत.