शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता विवाहिता, दोन मुलांचे मृतदेह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:01 IST

: फुलंब्री तालुक्यातील नायगाव येथे पतीशी भांडण झाल्याने रागाच्या भरात घरातून निघून गेलेली विवाहिता, एक मुलगा व एक मुलगी यांचे मृतदेह नायगाव शिवारातील नालाबांध व विहिरीत मिळून आल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली

लोकमत न्यूज नेटवर्कपिशोर : फुलंब्री तालुक्यातील नायगाव येथे पतीशी भांडण झाल्याने रागाच्या भरात घरातून निघून गेलेली विवाहिता, एक मुलगा व एक मुलगी यांचे मृतदेह नायगाव शिवारातील नालाबांध व विहिरीत मिळून आल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. यानंतर मुलाचा मृतदेह पाहून बापानेही विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.याबाबत पिशोरचे सपोनि. अभिजीत मोरे यांनी सांगितले की, फुलंब्री तालुक्यातील नायगाव येथील विवाहिता पुष्पाबाई अंकुश गायकवाड (२५) हीचे नवºयासोबत भांडण झाल्याने ती आपला मुलगा गुड्डू उर्फ साईराज अंकुश गायकवाड (५) याच्यासह शुक्रवारी रात्री घरातून निघून गेली होती. याबाबत विवाहितेचा भाऊ अंकुश विठ्ठल काकडे (रा.धानोरा ता. सिल्लोड) यांनी रात्री १.३० वाजेच्या सुमारास पिशोर पोलीस ठाण्यात बहिण व भाचा हरवल्याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीत मुलीचा उल्लेख करण्यात आला नव्हता असे पोलिसांनी सांगितले.शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस पाटील मयुरी गायकवाड यांनी पिशोर पोलिस ठाण्यात माहिती दिली की, गावातील गुड्डू उर्फ साईराज अंकुश गायकवाड हा मृतावस्थेत रामदास गायकवाड यांच्या गट नं. १० जवळील नालाबांधमध्ये आढळून आला आहे.सपोनि अभिजीत मोरे, जमादार जगन्नाथ उबाळे, संजय देवरे, ईश्वर पाटील, संदीप कणकुटे व चालक सरवर खान हे घटनास्थळी दाखल झाले.मयत मुलगा हा विवाहितेसह बेपत्ता झाला असल्याचे निष्पन्न झाल्याने परिसरात पुष्पाबाईचा शोध घेतला. बाजूला असलेल्या विहिरीतच दुर्दैवी पुष्पाबाई तसेच सोबत मुलगी गुड्डी अंकुश गायकवाड (३) यांचाही मृतदेह आढळून आला. पोलिसांनी गावक-यांच्या मदतीने विहिरीतील मृतदेह वर काढले. तिन्ही मायलेकांचे मृतदेह बघून उपस्थितांचे मन हेलावले.पोलीस पाटील मयुरी गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरुन पिशोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून रविवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे सपोनि. मोरे यांनी सांगितले. ऐन दिवाळी सणाला ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.