शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

रांजणगावातून महिला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:02 IST

वाळूज महानगर : रांजणगावातून एक २७ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली. प्रियंका ...

वाळूज महानगर : रांजणगावातून एक २७ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली. प्रियंका राहुल पुंडगे ही महिला ११ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता घरातून निघून गेली. सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिचा पती राहुल पुंडगे यांनी पोलीस ठाणे गाठले.

फोटो क्रमांक- प्रियंका पुंडगे (बेपत्ता)

----------------------------

पंढरपुरात सांडपाणी उघड्यावर

वाळूज महानगर : पंढरपूर ग्रामपंचायतीलगत असलेल्या वॉशिंग सेंटरचे सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याने रस्त्यावर सांडपाणी साचत आहे. येथील वाशिंग सेंटरवर वाहने धुणाऱ्यांची मोठी गर्दी असते. मात्र वाहने धुतांना सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याने दूरपर्यंत पाण्याचे लोंढे वाहतात. या सांडपाण्यामुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

----------------------

म्हाडा कॉलनीत पाण्याची गळती थांबली

वाळूज महानगर : म्हाडा कॉलनीतील गळक्या व्हॉल्व्हची दुरुस्ती सिडकोने केली असून पाण्याची नासाडी थांबली आहे. येथील गळक्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असल्याने या परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता.

------------------------------

सारा व्यंकटेशमधील पथदिवे बंद

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरातील सारा व्यंकटेश या भागातील पथदिवे गत महिनाभरापासून बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने नागरिक व वाहनधारकांना अंधारातूनच ये-जा करावी लागत आहे. सिडको प्रशासनाकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याची ओरड नागरिकांतून केली जात आहे.

---------------------------------

बजाजनगरातून दुचाकी लंपास

वाळूज महानगर : बजाजनगरातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शरद गोरख दिवटे (रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर) यांनी १४ जानेवारीला रात्री दुचाकी ( एमएच २०, ए.के. ९३८६) घरासमोर उभी केली होती. चोरट्‌याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.

--------------------------------

कारचालकाविरुध्द गुन्हा दाखल

वाळूज महानगर : भरधाव व निष्काळजीपणे कार चालवून दुचाकीस्वारास जखमी करणाऱ्या कारचालकाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धार्थ भास्कर साळवे (२६ रा. वडगाव) हा २१ जानेवारीला दुचाकीने (एमएच१८, एस. ८३१९) जात असताना उद्योगनगरीतील साई हॉटेलसमोर पाठीमागून येणाऱ्या कारने (एमएच २०, सी.एच.२९५३) त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सिद्धार्थ साळवे हा जखमी झाला असून दुचाकीचे नुकसान झाले.

--------------------------