शेषराव वायाळ ,परतूरपरतूर विधानसभा मतदारसंघात मतदरांनी उमेदवारांना दिलेला बुथ व सर्कलनिहाय कल यावरुन उमेदवारांना कुठे झटका बसला व कुठे साथ मिळाली हे सिद्ध होण्याबरोबरच उमेदवारांनी लावलेली गणित काही गावांनी चुकविली आहे. परतूर विधानसभा मतदारसंघात अनेक गावांनी दिलेला कौल हा उमेदवारांसाठी धक्कादायक ठरण्याबरोबरच आत्म परिक्षण करायला लावणाराही आहे. शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ साखरे, राष्ट्रवादीचे राजेश सरकटे, अपक्ष चव्हाण निवास, हे अचानक बाहेरुन येवून निवडणूक रिंंगणात उतरले. मत विभागणीत महत्वाची भूमिका बजावली. आ. बबनराव लोणिकर, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, बाबासाहेब आकात हे स्थानिक व जनतेच्या संपर्कात असलेले उमेदवार यांची बांधलेली गणित या बाहेरच्या उमेदवारामुळे अचानक बदलली. माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांना परतूर शहरात मोठे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र चित्र वेगळेच झाले. परतूर शहरात माजी आ. जेथलिया यांना ५ हजार २२० एकूण मते मिळाली. सभापती बाबासाहेब आकात यांच्या शहरातील मतात चांगली वाढ झाली.त्यांना ३ हजार ४०३ एकूण मते मिळाली. आ. बबनराव यांच्याही मतात वाढ झाली आहे. त्यांना ३ हजार ४०६ मते मिळाली. तर शिवसेनेचे सोमनाथ साखरे यांना शहरात केवळ १ हजार ९४ मते मिळाली. शहरातील सेनेचे कार्यकर्ते मतदरांपर्यंत पोहचलेच नाहीत. मंठा शहरात आ. बबनराव लोणीकर यांना अल्प मते मिळाली. त्यांना केवळ ९९५ मते मिळाली. बाबासाहेब आकात यांनाही केवळ १ हजार ४१ मते मिळाली, तर सुरेशकुमार जेथलिया यांना ३ हजार ११७ सर्वाधिक मते मिळाली. आष्टी सर्कल बबनराव लोणीकर यांचा बाले किल्ला समजला जातो, परंतु आष्टी गावात माजी आ. जेथलिया यांनी आघाडी घेतली. लोणीकर यांना १ हजार ८९१ मते मिळाली. जेथलिया यांना २ हजार ८३२ मते मिळाली. बाबासाहेब आकात यांना केवळ २६१ मते मिळाली. सेवली गावात आ. लोणीकर यांना ८९९ मते जेथलिया यांना १४१४ मते मिळाली. बाबासाहेब आकात यांना ८८ मते मिळाली. सातोना गावात बाबासाहेब आकात यांना सर्वाधिक १ हजार ६७८ मते मिळाली. लोणीकर यांना ५५० मते. जेथलीया यांना ६७० मते, तळणी आ. लोणीकर यांना १ हजार २२ मते, सभापती आकात यांना ४८१ मते, मा. आ. जेथलिया यांना ३२८ मते, नेरमध्ये मा. आ. जेथलिया यांना १ हजार २१४ मते, आ. लोणीकर ३९९ मते, सभापती आकात २४८ मते. मिळाली अपक्ष उमेदवार निवास चव्हाण यांना तांडयावर मोठे मताधिक्य राहिले.इतर उमेदवरांना काही उमेदवारांना एक अंकीही मतदान चव्हाण यांनी मिळू दिले नाही. निवास चव्हाण यांना किर्ला ३२५ मते, बेलोरा २५९ मते, उखळी ४३२ मते, माळेगाव ३८५ मते, आंबेवाडी ३७८ मते, वाघोडा तांडा ६४५ मते परतवाडी ६३४ मते, को. हादगाव ५३३ मते आदी तांडयावर इतर उमेदवारांना एक अंकी मतावर आणले.एकूणच ही पंचरंगी निवडणूक गावातील मतांच्या आकडयांचे गणित चुकवित ही लढाई निकराची तिरंगी होऊन बसली. ऐनवेळी भाजपाचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी आकडयांचे गणित जुळवत विजय मिळवला.परतूर विधानसभा मतदारसंघात अनेक गावांनी दिलेला कौल हा उमेदवारांसाठी धक्कादायक ठरण्याबरोबरच आत्म परिक्षण करायला लावणाराही आहे. शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ साखरे, राष्ट्रवादीचे राजेश सरकटे, अपक्ष चव्हाण निवास, हे अचानक बाहेरुन येवून निवडणूक रिंंगणात उतरले. मत विभागणीत महत्वाची भूमिका बजावली. आ. बबनराव लोणिकर, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, बाबासाहेब आकात हे स्थानिक व जनतेच्या संपर्कात असलेले उमेदवार यांची बांधलेली गणित या बाहेरच्या उमेदवारामुळे अचानक बदलली.
उमेदवारांचे गणित चुकविले
By admin | Updated: October 21, 2014 00:56 IST