शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निम्मे बालमृत्यू अतिसाराने !

By admin | Updated: July 19, 2015 00:25 IST

संजय तिपाले , बीड जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण ३२ टक्के इतके असून यापैकी निम्मे मृत्यू केवळ अतिसार झाल्याने होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे.

संजय तिपाले , बीडजिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण ३२ टक्के इतके असून यापैकी निम्मे मृत्यू केवळ अतिसार झाल्याने होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. त्यामुळे आता आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून अडीच लाख बालकांना मोफत ‘ओआरएस’ (अतिसार प्रतिबंधक पावडर) देण्याची मोहीम उघडली आहे. सोबतच मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी मातांना आशा सेविकांमार्फत धडे दिले जाणार आहेत.२७ जुलै ते ८ आॅगस्ट या दरम्यान ‘अतिसार नियंत्रण पंधरवाडा’ राबविला जात आहे. पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी आशा व आरोग्य कर्मचारी ‘डोअर टू डोअर’ जाणार आहेत. प्रत्येक बालकांना मोफत ओआरएस दिले जाणार आहे. ओआरएसचे द्रावण कसे तयार करायचे? याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. अतिसाराची लागण झालेल्या बालकांना झिंक गोळी देण्यात येणार आहे. सर्वेक्षणातून एकही बालक सुटू नये, अशा सूचना संबंधितांना दिल्या असल्याचे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी ‘हात धुवा’ मोहीम राबविणार आहेत. प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ते स्वच्छतेबाबत टिप्स देणार असून त्यांनाही यासंदर्भात सूचना दिल्याचे वडगावे म्हणाले.मातांना समूपदेशनसर्वेक्षणावेळी आशा स्वयंसेविका मातांचे समूपदेशन करणार आहेत. स्तनपानाचे महत्त्व, ६ महिन्यानंतर बाळाला द्यावयाच्या अन्नाबाबतही माहिती दिली जाणार आहे. खीर, पराठा, मुगदाळ, खीर हे पदार्थ लाभदायक असून स्वच्छतेबाबत काळजी घेण्याचे आवाहन डॉ. वडगावे यांनी केले आहे.अशी घ्या काळजी!बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय जानवळे यांनी सांगितले की, पावसाळ्यात बालकांमध्ये अतिसार होण्याची दाट शक्यता असते. गेल्या काही दिवसांत अतिसाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. उघड्यावरील अन्न मुलांना देणे टाळावे, शौचानंतर व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे, परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी उकळून प्यावे, असा सल्ला दिला.कोवळ्या जिवांचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना सुरु आहेत. प्रशासनाने अतिसार नियंत्रणासाठी पंधरा दिवसांची मोहीम उघडली आहे. त्यापूर्वीच बालकांमध्ये अतिसाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. अतिसार, उलट्यांमुळे अनेक बालके त्रस्त असून दवाखान्यांमध्ये गर्दी वाढत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.