शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
2
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
3
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
4
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
5
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
6
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
7
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
8
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
9
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
10
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
11
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
12
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
13
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
14
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
15
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
16
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
17
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
18
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
19
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
20
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
Daily Top 2Weekly Top 5

उद्या मुंबईत धडकणार एमआयएमची तिरंगा यात्रा, सभेचे स्थळ गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 16:34 IST

एमआयएमतर्फे मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाची जमीन यावर आंदोलन पुकारण्यात आले आहे.

औरंगाबाद : मुस्लीम आरक्षण ( Muslim Reservation ) आणि वक्फ बोर्डच्या प्रश्नावर एमआयएमची ( MIM ) तिरंगा यात्रा शनिवारी मुंबईत धडकणार. यात्रेत प्रत्येक वाहनावर तिरंगा असेल, उद्या पहाटे औरंगाबाद येथून अहमदनगर, पुणे मार्गे सर्वजण मुंबईला पोहचतील, तर राज्यातील अनेक भागातून वाहने थेट मुंबईत येतील, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiyaj Jalil )यांनी आज दिली. तसेच मुंबईत होणाऱ्या सभेचे ठिकाण मुद्दामहून गुलदस्त्यात असून ते उद्याच कळेल, असेही त्यांनी या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

पुढे बोलताना खा. जलील म्हणाले, एमआयएमतर्फे मुस्लीम आरक्षण आणि वक्फ बोर्डाची जमीन यावर आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा विषय न्याय प्रविष्ठ आहे. मात्र, मुस्लीम आरक्षण देण्यात यावे असे न्यायालयाचे निर्देश असतानाही ते मिळत नाही, अशी मुस्लिमांची स्थिती आहे, ते तत्काळ लागू करावे अशी मागणी एमआयएमतर्फे सातत्याने करण्यात येत आहे. यासोबतच दुसरी मागणी ही वक्फ बोर्डा संबंधित आहे. वक्फ बोर्डच्या जमिनीसंदर्भात आम्ही शरद पवार, फौजिया खान आदींना भेटलो, मात्र यावर समाधानकारक उपाय मिळाला नाही. राज्यातील अनेक प्रकल्पात वक्फ बोर्डाच्या जमिनी गेल्या आहेत, त्याचा मोबदला संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा आहे, हि रक्कम जवळपास १ हजार कोटी आहे. ती रक्कम मुस्लीम समाजासाठी वापरावी,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मुंबईत सभा पाच वाजता असून त्याचे ठिकाण ऐनवेळी कळविण्यात येईल, असे खा. जलील यांनी जाहीर केले.

यावेळी माघार नाहीदोन्ही मुद्दे  राजनीतिक नसल्याने राज्यातील सर्व पक्षांमधील मुस्लीम नेत्यांना आम्ही पत्र पाठवून यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात्रेसाठी आम्ही मार्गावरील सर्व शहरात पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. पहिल्या वेळी यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र यावेळी कोणत्याही कारणांनी आम्ही यात्रा आणि मुंबईतील सभा रद्द करण्यात येणार नाही, असा इशारा खा. जलील यांनी यावेळी दिला. 

सभेचे ठिकाण उद्या कळणार कारण आम्ही मागील काही दिवसांपासून सभेसाठी घेतलेले ठिकाणनंतर राजनैतिक दबाव आल्याने समोरून रद्द करण्यात आले आहे. यामुळे उद्या होणाऱ्या सभेच्या ठिकाणाबाबत गुप्तता बाळगण्यात येत आहे. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMuslimमुस्लीम