शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बुढीलेनमध्ये एमआयएमला दोन्ही काँग्रेसचे आव्हान

By admin | Updated: August 10, 2016 00:28 IST

औरंगाबाद : जुन्या शहरातील अत्यंत मध्यवर्ती भाग असलेल्या बुढीलेन वॉर्ड क्र २१ मध्ये पोटनिवडणुकीत एमआयएमला कडवट आव्हान देण्यासाठी दोन माजी नगरसेविका काँग्रेस

औरंगाबाद : जुन्या शहरातील अत्यंत मध्यवर्ती भाग असलेल्या बुढीलेन वॉर्ड क्र २१ मध्ये पोटनिवडणुकीत एमआयएमला कडवट आव्हान देण्यासाठी दोन माजी नगरसेविका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. हा वॉर्ड परत आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी एमआयएमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बुढीलेन वॉर्डात एमआयएमचे कार्यकर्ते शेख रफीक यांच्या मातोश्री शहनाज बेगम मोहंमद खाजामियाँ यांना एमआयएमने उमेदवारी दिली आहे. मंगळवारी दुपारी आ. इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत शहनाज बेगम यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष अ‍ॅड. अन्वर कादरी, विरोधी पक्षनेता अय्युब जहागीरदार, गटनेता नासेर सिद्दीकी, नगरसेवक फिरोज खान आदींची उपस्थिती होती.काँग्रेसतर्फे या वॉर्डातून माजी नगरसेविका निखत एजाज झैदी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्या उपस्थितीत झैदी यांचा अर्ज मोठ्या उत्साहात भरण्यात आला. २०१५ मध्ये निखत झैदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली होती. त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. झैदी यांना १०८३ मते पडली होती.मागील निवडणुकीत कैसर खान यांनी आपली मुलगी खान राणा कौसर हिला काँग्रेसच्या तिकिटावर उभे केले होते. तिने ९७५ मते मिळविली होती. आता खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पत्नी तथा माजी नगरसेविका परवीन कैसर खान यांना उभे केले आहे. या निवडणुकीत त्यांची आणखी एक डोकेदुखी म्हणजे कैसर खान यांचा पुतण्या तथा नगरसेवक फिरोज खान आपल्या काकूच्या विरोधात प्रचार करणार आहे. अपक्ष उमेदवार म्हणून अहेमद तरन्नुम अखिल, नसरीन बेगम सय्यद आबेद अली यांनीही उमेदवारी दाखल केली.