शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

एमआयएम शहराध्यक्षाला पिटाळले

By admin | Updated: May 6, 2016 00:02 IST

औरंगाबाद : महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासह पदाधिकाऱ्यांना अरेरावी करणारे एमआयएमचे शहराध्यक्ष अन्वर कादरी यांना संतप्त नागरिकांनी धक्काबुक्की करून तेथून पिटाळून लावले.

औरंगाबाद : खाम नदीतील अतिक्रमणांची पाहणी करण्यासाठी गेलेले महापौर त्र्यंबक तुपे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासह पदाधिकाऱ्यांना अरेरावी करणारे एमआयएमचे शहराध्यक्ष अन्वर कादरी यांना संतप्त नागरिकांनी धक्काबुक्की करून तेथून पिटाळून लावले. हर्सूल परिसरातील एकतानगरात सकाळी ही घटना घडली. कादरी हे नागरिकांऐवजी बिल्डरांची बाजू घेत असल्याचा आरोप नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना केला. पावसाळ्यापूर्वी खाम नदीतील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासनाने दोन दिवसांपासून नदीपात्राची मोजणी सुरू केली आहे. मात्र, संपूर्ण पात्राची मोजणी करण्यास नागरिकांचा विरोध होत असून, गुरुवारी नगरसेवक रूपचंद वाघमारे यांच्या मागणीवरून आयुक्त बकोरिया, महापौर तुपे, उपमहापौर राठोड हे सकाळी पाहणी करण्यासाठी एकतानगरमध्ये गेले होते. यावेळी नगरसेवक राजू वानखेडे, शिवाजी दांडगे, शहर अभियंता सखाराम पानझडे यांची उपस्थिती होती.उपमहापौर राठोड यांनी कादरी यांना थांबवून आम्ही पदाधिकारी बोलतोय आपण नंतर बोला असे सांगितले. मात्र, कादरी यांनी मी शहराध्यक्ष आहे, प्रतिनिधीला तुम्ही थांबविता काय असा सवाल केला. त्यावर तुपे यांनी तुम्ही प्रतिनिधी आहात तर मग आम्ही कोण, असा सवाल केला. त्यानंतर चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतरही कादरी यांनी कोणाचेही न ऐकता आयुक्तांसमोर हातवारे करीत मोठमोठ्याने बोलत असल्याने आयुक्तांच्या अंगरक्षकाने कादरी यांना बाजूला नेऊन शांत राहण्याचे सांगितले. त्यानंतर ते नगरसेवकांना उद्देशून बोलू लागले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी (पान २ वर)एमआयएमचे शहराध्यक्ष म्हणाले...महापौर आणि उपमहापौर यांनी गैरवर्तन केले. लोकांसाठी मी आयुक्तांशी बोलत होतो. मी कुठल्याही बिल्डरसाठी तेथे गेलो नव्हतो. ते गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते सोबत घेऊन फिरतात, याचे वाईट वाटते. मला कुणीही मारहाण केली नाही. मनपाच्या पदाधिकाऱ्यांनीच मला शिवीगाळ केल्याचा आरोप एमआयएमचे शहराध्यक्ष अन्वर कादरी यांनी केला. कादरी यांनीच लुडबूड केलीनागरिकांनीच कादरीला लुडबूड करू नका, असे समजावून सांगत तेथून जाण्यास सांगितले. परंतु ते ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे नागरिकांनीच त्यांना तेथून चोप देऊन पिटाळले. त्यांना कुणीही शिवीगाळ केली नाही. उलट महापौर व इतर पदाधिकाऱ्यांसह आयुक्तांशी त्यांनी बोलण्याची उर्मट भाषा नागरिकांना आवडली नाही, असे उपमहापौर प्रमोद राठोड म्हणाले.