शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या कामांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 00:22 IST

औरंगाबाद : मराठवाडा सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागांतर्गत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांची कामे चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहेत.

औरंगाबाद : मराठवाडा सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागांतर्गत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांची कामे चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहेत. ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर गुणवत्ता व दक्षता विभागाकडून या कामांचा चौकशीपूर्ण अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांमध्ये रस्ते व इमारत निर्मितीच्या कामांचा समावेश आहे. औरंगाबाद, नांदेड, लातूर या परिमंडळांतर्गत बांधकाम विभागाचा विस्तार मराठवाड्यात झालेला आहे. औरंगाबाद मंडळात जालना जिल्ह्याचा समावेश आहे. नांदेडमध्ये परभणी, हिंगोलीचा, तर लातूरमध्ये उस्मानाबाद, बीडचा समावेश आहे. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता अशा स्तरावरून मंजूर झालेल्या कामांबाबत तक्रारी आल्यानंतर गुणवत्ता व दक्षता अधीक्षक अभियंता विभागाकडून त्या कामांची चौकशी सुरू होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ७० ते ८० कामांची चौकशी सुरू आहे. जी कामे निकृष्ट असतील, त्यामध्ये दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. तसेच निविदेत कंत्राटदारांकडे दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी असेल तर त्याअंतर्गत कामे पूर्ण करून घेतली जातात, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गुणवत्ता व दक्षता विभागाचे अधीक्षक अभियंता डी. डी. उकिर्डे यांना याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, निश्चित किती प्रकरणांत चौकशी सुरू आहे, हे सांगता येणार नाही. तक्रारअंती विभाग चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येतो.