शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

लाखो गणेशमूर्र्तींचा संगम; भाविक सज्ज

By admin | Updated: September 16, 2015 12:03 IST

औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर स्थानिकच नव्हे, तर अकोला, अमरावती, नाशिक व नगर जिल्ह्यांतून लाखभर गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत

औरंगाबाद : औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर स्थानिकच नव्हे, तर अकोला, अमरावती, नाशिक व नगर जिल्ह्यांतून लाखभर गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत. २५ मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्तींचा संगम एकाच ठिकाणी झाल्याने गणेश भक्त प्रत्येक स्टॉलवर फिरून गणरायाची अनंतरूपे आपल्या डोळ्यात साठवून घेत आहेत. जिल्हा परिषद मैदानात मागील १४ वर्षांपासून गणेशोत्सवाआधी मूर्ती विक्रीचा बाजार भरत असतो. यंदा ५१ विक्रेत्यांनी येथे स्टॉल मांडले आहेत. याशिवाय ७ मूर्तिकारांनीही येथे मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यंदा परजिल्ह्यांतूनही लहान व मध्यम आकारांतील १ लाख मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत.दरवर्षी गणेशोत्सवात मूर्तिकार नवनवीन रूपांत गणरायाला घडवीत असतात. यंदा बॉक्स आॅफिसवर सर्व विक्रम मोडणाऱ्या ‘बाहुबली’ चित्रपट व टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘जय मल्हार’च्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशमूर्ती बाजारात आणल्या गेल्या आहेत. यात उजव्या खांद्यावर शंकराची पिंड घेतलेली बाहुबली गणेशमूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. चंद्रकोर असलेली आडवी पगडी धारण केलेली ‘जय मल्हार’ मूर्तीही सर्वांच्या पसंतीस पडत आहे. याशिवाय मनमोहक रूप असलेली बालगणेशाची मूर्तीही आबालवृद्धांना आकर्षित करीत आहे. लालबागचा राजाची मूर्तीही यंदा लहान आकारात उपलब्ध झाली आहे. तसेच पुण्यातील कसबा गणपती, मुंबईतील सिद्धिविनायकही येथे बघण्यास मिळत आहे. याव्यतिरिक्त साईबाबांच्या रूपातली गणेशमूर्तीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळच्या गणेशमूर्तींमध्ये अजून एक नवीन बदल पाहावयास मिळला तो म्हणजे मूर्तीसाठी वापरले जाणारे धोतराचे कापड हे वेल्वेटचे असून, ते वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे मूर्तीला एक वेगळीच चमक आली आहे. मात्र, अशा मूर्तींकडे केवळ एक आकर्षण म्हणूनच गणेशभक्त पाहतात. घरगुती पूजेसाठी आजही लोक पारंपरिक लहान मूर्तीलाच प्राधान्य देतात तसेच शास्त्रोक्त पद्धतीनुसार मूर्ती ही शक्यतो पाटावर किंवा चौरंगावर बसलेली व हातात ‘पाश’, अंकुश’ धारण केलेली असावी. यात ‘दगडूशेठ’, ‘मध्यम चौरंग, ‘म्हैसूर’, ‘पेशवा गणपती’, ‘नक्षी’, ‘सात्त्विक गणेश’, ‘वैभव गणेश’ या मूर्तींना पूजेसाठी जास्त मागणी असते. ९ ते ११ इंच उंचीच्या गणेशमूर्तीलाच जास्त पसंती असते.