शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापूरसाठी पाऊण कोटी; म्हणे परफॉर्मन्स पाहिला !

By admin | Updated: April 8, 2017 00:18 IST

उस्मानाबाद : भाजप-सेना युतीची सत्ता आहे. असे असतानाही नगरोत्थान योजनेअंतर्गत पालिकांना निधी मंजूर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ताकेंद्र असणाऱ्या पालिकांना झुकते माप देण्यात आले

उस्मानाबाद : केंद्र तसेच राज्यातही भाजप-सेना युतीची सत्ता आहे. असे असतानाही नगरोत्थान योजनेअंतर्गत पालिकांना निधी मंजूर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ताकेंद्र असणाऱ्या पालिकांना झुकते माप देण्यात आले आहे. तर भाजप-सेनेची सत्ता असणाऱ्या पालिकांची सात ते दहा लाखापर्यंत निधी देऊन बोळवण केली आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात पायाभूत व सामाजिक सुविधा निर्माण करणे व बळकटीकरणासाठी जिल्हा योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व मल:निसारण, नागरी स्वच्छता, सामाजिक पायाभूत सुविधा, नागरी दळणवळण साधनांचा विकास, पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास, शालेय शिक्षणाशी निगडीत पायाभूत सुविधा इ. कामे करता येताता. या योजनेच्या माध्यमातून आठ पालिकांसाठी सुमारे २ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. केंद्रासोबतच राज्यातही भाजप-सेना सत्तेत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची सत्ता असणाऱ्या सत्ताकेंद्रांना इतरांच्या तुलनेत झुकते माप मिळावे, अशी अशी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. परंतु, जिल्ह्यात याच्या उलट स्थिती दिसते. आठ पालिकांना मंजूर करण्यात आलेल्या रकमेवर नजर टाकली असता, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पालिकांना सढळ हाताने निधी मिळाला आहे. यामध्ये तुळजापूर पालिकेला तब्बल पाऊण कोटी रूपये मंजूर झाले आहेत. परंडा पालिकेलाही सुमारे अर्धा कोटीपेक्षा अधिक रक्कम मंजूर केली आहे. असे असतानाच दुसरीकडे आठ पालिकांपैकी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या व सेना-भाजपाचे सत्ताकेंद्र असणाऱ्या उस्मानाबाद पालिकेला अवघे दहा लाख रूपये मंजूर केले आहेत. अशीच अवस्था उमरगा पालिकेची आहे. ज्या ठिकाणी भाजप काँग्रेसच्या सोबतीने सत्तेत आहे. या पालिकेला तर केवळ ७ लाख रूपये देऊन बोळवण केली आहे. राज्य आणि केंद्रात असूनही जिल्ह्यातील भाजप-सेनेची सत्ताकेंद्र असणाऱ्या संस्थांना झुकते माप मिळणार नसेल तर सत्तेचा उपयोग काय, असा सवाल आता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांतून उपस्थित होत आहे.