शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

९० टक्के लहान मुलांत सौम्य लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लहान मुलांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे साधारणपणे ...

औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लहान मुलांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे साधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात. लहान मुलांमधील कोरोना गंभीर स्वरूपाचा होत नाही. ९० टक्के मुलांमध्ये सौम्य लक्षणे दिसतात. परंतु योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटनेने म्हटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या पुणे, मुंबई, औरंगाबाद नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांत वेगाने वाढत आहे. यावेळच्या लाटेचे वैशिष्ट्य म्हणजे अधिक संसर्गजन्य विषाणू व लहान मुलांमधील वाढलेले कोविड संसर्गाचे प्रमाण. संपूर्ण बाधित होत आहेत. लहान मुलांच्या संसर्गाबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने नक्की काय करावे, या संभ्रमात पालक असतात. यामुळे बालरोगतज्ज्ञ संघटनेतर्फे ‌‌‘लहान मुलांमधील कोरोना’ याविषयीची परिस्थिती समोर आणली आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे साधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात. लहान मुलांमधील कोरोना गंभीर स्वरूपाचा होत नाही. ९० टक्के मुलांमध्ये सौम्य लक्षणे दिसतात. बालकांना रुग्णालयात भरती करण्याची गरजही कमी पडते. प्रौढांमधील आजार गुंतागुंतीचा होतो. इतर शारीरिक व्याधी (डायबिटीस, उच्च रक्तदाब) या प्रौढांसारख्या लहान मुलांमध्ये नसतात, लसीकरणामुळे मिळालेली प्रतिकारशक्ती मुलांमध्ये असते. लहान मुलांमध्ये व्यसनाधीनता नसल्यामुळे त्यांची फुफ्फुसे निरोगी असतात, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्याम खंडेलवाल, सचिव डॉ. संध्या कोंडपल्ले, डॉ. मंदार देशपांडे यांनी दिली.

लहान मुलांमधील कोरोना आजाराची सर्वसामान्य लक्षणे...

- ६० टक्के मुलांमध्ये कोणतीच लक्षणे आढळत नाहीत.

- सर्दी, ताप, खोकला (सौम्य), उलट्या, जुलाब

- डोकेदुखी, अंगदुखी

- अंगावर पुरळ येणे

- भूक कमी लागणे व थकवा

---

गंभीर व धोक्याची लक्षणे...

- फणफणून आलेला ताप १०० डिग्री फॅरनहाइटच्या पुढे

- बाळ सुस्त होणे

- लघवीचे प्रमाण कमी होणे

- डोळे लाल होणे

- हाता-पायावर सूज व पुरळ येणे

- दम लागणे व कण्हणे

-----

लहान मुलांची कोरोना टेस्ट केव्हा करावी?

१) घरात कोणी कोरोनाबाधित रुग्ण असल्यास, त्याच्या संपर्कात मूल आले असल्यास व त्याच्यात वरील लक्षणे आढळून आल्यास.

२) गंभीर स्वरूपाचा श्वसनमार्गाचा संसर्ग.