शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मिका सिंगने लग्न करण्यासाठी ठेवलीय अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:02 IST

एका कार्यक्रमात मिका सिंगने सूत्रसंचालक करण वाही याच्याशी गप्पा मारल्या आणि आपण स्वत:साठी वधूचा शोध घेत आहोत, असे गमतीत ...

एका कार्यक्रमात मिका सिंगने सूत्रसंचालक करण वाही याच्याशी गप्पा मारल्या आणि आपण स्वत:साठी वधूचा शोध घेत आहोत, असे गमतीत सांगितले; पण लग्नाबद्दल त्याची एक विशिष्ट अट असून, तिचा थेट संबंध या कार्यक्रमाचा ब्रॅण्ड ॲम्बॅसडर सलमान खानशी आहे. त्याने सांगितले, “मला लग्न करायचं असून, त्यासाठी मी योग्य मुलीचा शोध घेत आहे. कदाचित मला सुयोग्य नवरी सापडेलही, पण सलमान खानने लग्न केल्यानंतरच मी लग्न करणार आहे. ही माझी अट आहे. तोपर्यंत मी सिंगल जीवन मजेत जगणार आहे. साजिद भाईने म्हटल्याप्रमाणे सलमान भाईनंतर बॉलिवूडच्या जगात केवळ मीच अविवाहित तरुण असेन. मला हे बिरूद जास्तीत जास्त काळ मिरवायचं आहे!”

'ती परत येतेय'

लय भारी चित्रपटातील नंदिनी आठवतेय का तुम्हाला.... नंदिनीचा तो ग्लॅमरस रोल पडद्यावर साकारला होता, अभिनेत्री आदिती पोहणकर हिने. या चित्रपटानंतर ती चित्रपटसृष्टीत फारशी दिसली नाही. या चित्रपटानंतर तिने ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून मराठी पडद्यावर कमबॅक केले होते. त्यानंतर ती 'शी' या वेबसीरिजमध्ये झळकली होती. तिच्या सीरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता 'शी' या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच भेटीला येणार आहे. आदितीनेच फोटो शेअर करत याची माहिती दिली. तिने लिहिले, 'ती (शी) परत येतेय' आम्ही तयार आहोत. भूमी २०२१ मध्ये परत येणार आहे; पण ती कोणाच्या बाजूने आहे ?

पंजाबी ड्रेसमध्ये खुलले मौनी रॉयचे सौंदर्य

मौनी रॉय एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मौनी रॉय कॉलेजच्या दिवसांत कोरिओग्राफर म्हणून काम करत होती. ती सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक, तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने आपले एक हटके फोटोशूट शेअर केले आहे. यात ती लाल रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, 'लाली मेरे लाल की जित देखूं उत लाल, लाली देखन मै गयी मैं भी हो गयी लाल...'. मौनी रॉयने जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी, दिल्लीमधून इंग्रजी ऑनर्स आणि जनसंचार कोर्स केला आहे. त्यानंतर तिने टीव्ही जगतात एन्ट्री केली.