शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरणाचा डाव

By admin | Updated: April 9, 2017 23:19 IST

परळीयेथील राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे गेल्या १५ वर्षांपासून असलेले विभागीय कार्यालय परळीतून बीडला स्थलांतरीत करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

संजय खाकरे  परळीयेथील राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे गेल्या १५ वर्षांपासून असलेले विभागीय कार्यालय परळीतून बीडला स्थलांतरीत करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याशिवाय परळीतील पाटबंधारे विभागाचे कार्यालयही लातूरला हलविण्याचा डाव आहे. गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नामुळे परळीला राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय कार्यालय मंजूर झाले. या कार्यालयांतर्गत बीड, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर या चार जिल्ह्यांतील कापूस खरेदी केंद्रांचे नियंत्रण केले जात होते. या कार्यालयातून कापूस खरेदी- विक्रीचे कोट्यवधींचे व्यवहार होत असत. त्यामुळे परळीत चार जिल्ह्यांतून कापूस जिनिंग, प्रेसिंंगचे चालक, मालक यायचे. यातून हॉटेल व्यवसायासह पर्यटनालाही चांगला फायदा होत असे. तसेच विविध कामांच्या निविदा ही परळीच्या कार्यालयातून निघत असत त्यामुळे महसूलही प्राप्त व्हायचा. सहकार क्षेत्रातील या कार्यालयांमुळे परळीचा दबदबा निर्माण झाला होता; परंतु हे कार्यालय बीड येथे असलेल्या पणन महासंघाच्या उपविभागीय कार्यालयात स्थलांतरीत करण्याचे तोंडी आदेश वरिष्ठ कार्यालयातून प्राप्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी परळीचे विभागीय कार्यालय हलवू नये यासाठी प्रयत्न केले होते; परंतु पुन्हा आता हे कार्यालय बीड येथे नेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परळी कार्यालयावर होणारा भाड्यापोटीचा खर्च व कर्मचाऱ्यांवरील खर्च टाळण्यासाठी परळीतून पणन महासंघाचे विभागीय कार्यालय बीड येथे नेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. परळी येथे युतीच्या काळातच विद्युत मंडळाचे चार जिल्ह्यांसाठीचे विभागीय कार्यालय मंजूर झाले होते. ते यापूर्वीच लातूरला हालविण्यात आले आहे. पाठोपाठ परळीतील पाटबंधारे खात्याचे विभागीय कार्यालयही लातूरला नेण्याच्या हालचाली सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.