शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांचे परप्रांतात स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:34 IST

तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची वाणवा असल्याने हजारो हात रिकामे आहेत़ कामाच्या शोधात मजूर परप्रांतात जात आहेत़ सध्या कापूस वेचणी हंगाम सुरू असून सीमावर्ती भागातील मजुरांना ने-आण व सात रुपये प्रतिकिलो कापूस वेचणी मिळू लागल्याने तेलंगणात मोठ्या प्रमाणावर मजूर जात आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची वाणवा असल्याने हजारो हात रिकामे आहेत़ कामाच्या शोधात मजूर परप्रांतात जात आहेत़ सध्या कापूस वेचणी हंगाम सुरू असून सीमावर्ती भागातील मजुरांना ने-आण व सात रुपये प्रतिकिलो कापूस वेचणी मिळू लागल्याने तेलंगणात मोठ्या प्रमाणावर मजूर जात आहेत़किनवट तालुक्यात १ लाख नोंदणीकृत मजूर व ४२ हजार जॉबकार्ड धारक कुटुंब आहेत़ मागेल त्याला काम कामाप्रमाणे दाम देण्यासाठी शासनाने २ फेब्रुवारी २००६ रोजी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली़ साडेअकरा वर्षाचा कालावधी ही योजना सुरू होवून लोटत आला तरी तालुक्यात या योजनेला म्हणावे तसे अच्छे दिन आले नाहीत़ परिणामी हजारो मजुरांच्या रोजीचा प्रश्न कायम आहे़अलीकडच्या काळात मग्रारोहयोला घरघर लागली आहे़ परिणामी मजुरांच्या हाताला कामच मिळत नसल्याचे चित्र आहे़ तालुक्यात मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असताना हाताला कामच मिळत नसल्याने हजारो हात रिकामेच आहेत़ घरकुल व रोपवाटीका अशी पंचायत समिती व यंत्रणेची काही बोटावर मोजण्याइतकी कामे सुरू असून तीनशेच्या आसपास मजूर कामावर आहेत़ १ लाख नोंदणीकृत मजूरसंख्या असताना प्रत्यक्षात कामावरील मजुरांचा आकडा पाहता मग्रारोहयोचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे़हातावर आणून पानावर खाणाºया मजुरांची संख्या मोठी आहे़ कुटुंबाच्या कुटुंबच रिकामे असल्याने मजुरांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे़सध्या कापूस हंगाम सुरू आहे़ तालुक्यातील शेतकरी ३ ते ५ रुपये प्रतिकिलो वेचणीचे दर देत असल्याने हे भाव परवडणारे नसल्याने कापूस वेचणीकडे मजुरांनी पाठ फिरविली आहे़ त्यात कापूस पिकाचा उताराही कमी असल्याने मजुरांना ते परवडत नाही़ असे असतानाच लगतच्या तेलंगणात कापूस पिकांचे प्रचंड क्षेत्र असल्याने तेथील शेतकरी किनवट तालुक्याच्या सीमावर्ती भागातील गावात येवून मजुरांशी संपर्क साधून त्यांना कापूस वेचणीसाठी तेलंगणात नेत असल्याचे पहावयास मिळत आहे़प्रतिकिलो सात रुपये व ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली जात असल्याने रिकाम्या हाताने असलेले मजूर तेलंगणात कापूस हंगाम झोडपतांना दिसत आहेत़ मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी गावोगाव मग्रारोहयोची कामे सुरू करावी अशी मागणी मजूर वर्गाची आहे़ परंतु प्रशासन ढिम्मच आहे.