लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडकोच्या वाळूज महानगरच्या रेट्यातून चार गावांतील १८९ गटांतील सुमारे ६ हजार हेक्टर जमिनीची सुटका झाली आहे ती गावे आता आगामी काही वर्षांत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्यमशील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आॅक्टोबर २०१४ मध्ये याबाबत निर्णय झाला होता. त्यावर यावर्षी अमल झाला आहे. यानुसार १५ हजार एकर जागेसाठी एमआयडीसी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणार आहे.२८ जुलै रोजी याप्रकरणी नगरविकास विभागाने अधिसूचना जारी केली होती. त्यावेळी साजापूर, रामराई, वाळूज खुर्द, वडगाव कोल्हाटी या गावांतील १८९ गट वगळण्यात आले होते. परंतु तेथे कोण काय करणार हे स्पष्ट झाले नव्हते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गावांतील सुमारे ६ हजार हेक्टर जागा एमआयडीसीकडे नियोजनासाठी गेली आहे. त्यामुळे वाळूज परिसरात आणखी उद्योगांसाठी जागा उपलब्ध झाली आहे. सिडकोची ही गावे एनयूझेड (नो अर्बनायझेशन झोन) मध्ये होती. एमआयडीसी यासाठी नियोजन करणार आहे. सिडको कालपर्यंत फक्त १५० मीटरपर्यंतची परवानगी देत होती. ५ ते ६ परवानग्या सिडकोने आजवर अदा केलेल्या आहेत. यापुढे आता एमआयडीसी नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे.डीएमआयसी येण्यापूर्वीच तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार भाटिया आणि एमआयडीसीमध्ये याबाबत चर्चा झाली होती. अधिसूचनेमध्ये वाळूज महानगर येथील ८,५७१ पैकी १,७१४ हेक्टर क्षेत्र रहिवासी विभागात फेज-१ मध्ये समाविष्ट आहे. उर्वरित ६,८५६ हेक्टर क्षेत्र अ-नागरी विभाग (एनयूझेड) फेज-२ मध्ये आहे.
वाळूजमधील ६ हजार हेक्टर जागा एमआयडीसीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:29 IST