औरंगाबाद : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य अभियंता कार्यालय नांदेडहून औरंगाबादेत स्थलांतरित करण्यात आले आहे. १२ जिल्हे या कार्यालयास जोडण्यात आल्याने उद्योजकांचा फायदा होणार आहे.मराठवाड्यातील उद्योजकांसाठी ‘एमआयडीसी’ चे मुख्य अभियंता कार्यालय २००९ यावर्षी मंजूर झाले; परंतु औरंगाबादऐवजी नांदेडला ते सुरू करण्यात आले. त्यापूर्वी मुख्य अभियंता कार्यालय पुण्यात होते. त्यामुळे उद्योजकांना पुण्याऐवजी नांदेडच्या वाऱ्या कराव्या लागत असत. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत शेंद्रा - बिडकीन मेगा पार्कची उभारणी केली जात आहे. त्यामुळे नांदेडचे कार्यालय हलविण्याची मागणी उद्योग संघटनांनी केली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुख्य अभियंता कार्यालय नांदेडला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीत हे कार्यालय सुरू झाले असून, केदार नागपुरे यांनी मुख्य अभियंतापदाची सूत्रे स्वीकारली आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह नाशिक, धुळे, नगर आणि जळगाव हे १२ जिल्हे या कार्यालयाशी जोडण्यात आले आहेत.
‘एमआयडीसी’ मुख्य अभियंता कार्यालय आता औरंगाबादेत
By admin | Updated: July 18, 2016 01:12 IST