शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज महानगरात अतिक्रमणाला अभय;झाडांचा मात्र सर्रास बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 18:56 IST

बजाजनगरात एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून विकास कामांत अडथळा ठरणाऱ्या धनदांडग्यांच्या अतिक्र्रमणाला अभय दिले जात आहे.

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : बजाजनगरात एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून विकास कामांत अडथळा ठरणाऱ्या धनदांडग्यांच्या अतिक्र्रमणाला अभय दिले जात आहे. दुसरीकडे मात्र विकास कामांच्या नावाखाली विनापरवाना झाडांचा बळी घेतला जात आहे. याकडे वनविभाग प्रशासनही डोळेझाक करीत आहे. 

बजाजनगरमध्ये रस्ता रुंदीकरण, ड्रेनेजलाईन आदी विकासकामे सुरू आहेत. एमआयडीसीकडून यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.  रामलीला मैदान ते मोहटादेवी मंदिर रस्तावगळता बहुतांशी सर्वच मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण केले जात आहे. एमआयडीसीने रस्त्यावर आलेल्या मालमत्तांना मार्किंग करून संबंधित मालमत्ताधारकांना त्या काढून घेण्यास सांगितले होते. अनेक मालमत्ताधारकांनी रस्त्यावर आलेले बांधकाम स्वत: काढले. अडथळा ठरणारी बांधकामे काढण्यासाठी एमआयडीसीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली; मात्र हितसंबंधी व्यक्तीचे अतिक्रमण न पाडता नुसता कारवाईचा देखावा करून त्या अतिक्रमणाला अभय दिले; मात्र विकास कामांत अडथळा ठरत नसतानाही दोन जुन्या झाडांचा बळी घेतला.

बजाजनगरात एमआयडीसीच्या अनेक मोकळ्या भूखंडांवर अनेक धनदांडग्यांनी अतिक्रमण करून कोट्यवधी रुपयांच्या जागा बळकावल्या आहेत. हरितपट्टा तर नुसता कागदावरच शिल्लक आहे. नागरी वसाहत भागातही नागरिकांनी एमआयडीसीच्या जागेत बांधकाम के ले आहे. मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, लोकमान्य चौक, कोलगेट चौक परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर बांधकाम केले गेले आहे. प्रताप चौकातील काही व्यावसायिकांनी तर अतिक्रमण करून अंतर्गत रस्तेच बंद केले आहेत. हे अतिक्रमण रस्ता रुंदीकरण कामात अडथळा ठरत असल्याने नागरिकांकडून येथील अतिक्रमण हटविण्याची अनेकदा मागणी केली आहे. 

एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन दिवसांत त्याची पाहणी करून विकास कामांत अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वनरक्षक मनोज कांबळे म्हणाले, झाडे तोडल्याप्रकरणी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसीच्या हद्दीत धोकादायक झाडे असल्यास ती तोडण्याचा त्यांना अधिकार आहे.

व्यावसायिकांना फायद्यासाठी सर्वकाहीरस्ता रुंदीकरणात अडथळा नसतानाही एमआयडीसी अधिकाऱ्यांकडून व्यावसायिकांच्या फायद्यासाठी मोठमोठी झाडे धोकादायक ठरवून कत्तल केली जात आहे. पर्यावरण संवर्धनासाठी एकीकडे शासनासह विविध सेवाभावी, सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणात झाडे लावून संगोपन करीत आहेत, तर दुसरीकडे शासकीय अधिकारी उभ्या झाडावरच कुºहाड चालवीत आहेत. ५ जून रोजी हायटेक विद्यालयासमोरील कडुलिंबाचे, तर २४ जून रोजी मोरे चौकातील लिंबाचे अशी दोन झाडे तोडली. काही महिन्यांपूर्वी येथील अग्निशमन केंद्रातील अशोकाची ८ ते १० झाडे अशाच प्रकारे तोडली होती.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणWaluj MIDCवाळूज एमआयडीसी