शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

बाप्पांना निरोप

By admin | Updated: September 29, 2015 00:46 IST

बीड : ‘गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘बाप्पा मोरया रे’ अशा जयघोषात रविवारी लाडक्या गणरायाला मोठ्या हर्षोल्हासात निरोप देण्यात आला.

बीड : ‘गणपती बप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘बाप्पा मोरया रे’ अशा जयघोषात रविवारी लाडक्या गणरायाला मोठ्या हर्षोल्हासात निरोप देण्यात आला. जिल्हाभरात बंदी असतानाही डॉल्बीचा आवाज वाढलेला पहावयास मिळाला. किरकोळ प्रकार वगळता गणेश विसर्जन शांततेत पार पडले.‘शांताबाय’वर भक्तांचा ठेका!गणेश विसर्जन मिरवणुकीत ठिकठिकाणी ‘शांताबाय’ या मराठी गीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या गीतावर गणेशभक्तांनी ठेका धरला होता. बच्चेकपंनीसह वृद्धांनाही या गाण्याने ठेका धरण्यास भाग पाडले.खापरपांगरी छावणीतशेतकऱ्यांना पंगतगणपती विसर्जनानिमित्त खापरपांगरी (ता. बीड) येथील ओंकार सेवाभाावी संस्थेच्या चारा छावणीत शेतकऱ्यांना रविवारी पंगत देण्यात आली. छावणीत बसविलेल्या गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर पंगत पार पडली. छावणी संचालक अशोक हिंगे यांनी मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था केल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी माजी मंत्री सुरेश नवले, माजी आ. राजेंद्र जगताप, प्रा. सुशीला मोराळे, डॉ. रमेश पानसंबळ, सुहास पाटील, सुधाकर चव्हाण, बंडू आजबे, हरिदास घोगरे, गोरख चव्हाण, नामदेव शेंडगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)माजलगाव तालुक्यातील हिंगणी (खुर्द) येथे सकाळी ११ वाजता सहायक फौजदार रमेश पुरी यांनी अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या अशोक निवृत्ती सोळंके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून ८१६ रूपयांचा माल पकडला. रात्री बंदोबस्तासाठी पुरी व एम.ए.बदने हे गेले होते. मिरवणुकीदरम्यान रात्री दहाच्या सुमारास दारूची केस का दाखल केली ? अशी कुरापत काढुन आरोपी दत्ता बालासाहेब सोळंके व इतरांनी पोलिसांना दगडाने मारहान केली. यात बदने यांच्या डोक्यास मार लागल्याने गंभीर दुखापत झाली आहे. आरोपीविरूध्द दिंद्रूड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.डॉल्बी लावून कमाल आवाजाची पातळी (७५ डेसीबल) चे उल्लंघन करणाऱ्या १६ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परळीतील १, केजमध्ये २, माजलगावात ४ तर आष्टीत १ मंडळावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. बीडमध्ये पेठ बीड ठाण्यात तुळजाभवानी, महाराष्ट्र, न्यू साईगणेश, भोईराज, ओझर गणेशमंडळाविरूद्ध तर शहर ठाण्यात तीन मंडळांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डीजे चालक, मालक, वाहनचालकांनाही आरोपी करण्यात आले आहे.