शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

जीएसटीएन नेटवर्कचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:36 IST

जीएसटीएन नेटवर्कमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने पहिले विवरणपत्र दाखल न करूशकलेल्या सुमारे ४० टक्के करदात्यांना दररोज २०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जीएसटीएन नेटवर्कमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने पहिले विवरणपत्र दाखल न करूशकलेल्या सुमारे ४० टक्के करदात्यांना दररोज २०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. महिना संपत आला; पण अजूनही तांत्रिक अडचणी दूर करण्यात जीएसटीएन नेटवर्कला यश आले नाही. हे सरकारचे अपयश असूनही भुर्दंड करदात्यांना भरावे लागत असल्याने चार्टर्ड अकाऊंटंट, करदात्यांमध्ये संताप पसरला आहे.वस्तू व सेवा कर (जीएसटी) चे जुलै महिन्याचे पहिले विवरणपत्र आॅनलाइन भरण्याची २० आॅगस्ट अखेरची तारीख होती. मात्र, देशभरातून विवरणपत्र दाखल करण्याचा ओघ वाढल्याने जीएसटीएनच्या वेबसाइटवर मोठा ताण पडला व साइट वारंवार हँग होत राहिली. यामुळे लाखो करदात्यांना आॅनलाइन विवरणपत्र भरता आले नाही. अर्थमंत्रालयाने ही बाब लक्षात घेऊन विवरणपत्र भरण्याची मुदत आणखी ५ दिवस वाढवून २५ आॅगस्ट करण्यात आली व ज्यांना जुन्या स्टॉकवर इनपूट टॅक्स क्रेडिट घ्यायचे होते त्यांच्यासाठी विवरण भरण्याची २८ आॅगस्ट शेवटची तारीख होती. मुदत वाढवूनही बेवसाइटमधील तांत्रिक दोष दूर करता आले नाही. अजूनही जीएसटीएन नेटवर्कने गती पकडली नाही. ‘पहिले पाढे पंचावन’ अशीच परिस्थिती आहे. अर्थमंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे अजूनही ४० टक्के करदात्यांना आॅनलाइन विवरणपत्र दाखल करता आले नाही. जुलै २०१७ पासून बाह्य आपूर्ती विवरणपत्र जमा करण्याची सुविधा १५ जुलै २०१७ पासून उपलब्ध करून देण्यात आली.