शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यदत्ता फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा सत्कार

By | Updated: December 7, 2020 04:00 IST

यावेळी बोलताना डॉ. चोरडिया म्हणाले की, जीवन समृद्ध करायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना वाचनावर विशेष भर द्यावा. वेळेचे ...

यावेळी बोलताना डॉ. चोरडिया म्हणाले की, जीवन समृद्ध करायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना वाचनावर विशेष भर द्यावा. वेळेचे नियोजन करीत व्यावसायिक शिक्षण घेत असतानाच आपण निवडलेल्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात करणेही गरजेचे आहे, असे चोरडिया यांनी स्पष्ट केले. आपणच आपल्या यश- अपयशाला जबाबदार असतो. त्यामुळे कठोर मेहनत घ्या आणि तुमची स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा. हे जग अतिशय झपाट्याने बदलत असून, हे बदल स्वीकारण्याची आणि त्या अनुषंगाने स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्याची सवय लावून घ्या, अशा शब्दांत डॉ. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच शिक्षणासोबतच निरोगी राहणे, नातेसंबंधांची जपवणूक करणे हे यशस्वी जीवनासाठी आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तके वाचण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. रंजलकर म्हणाले की, कठोर व अथक परिश्रम, शिक्षणासाठी योग्य क्षेत्राची निवड, मित्रांची निवड यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा प्रमाणपत्र व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.

चौकट :

या गुणवंतांचा झाला सत्कार

आदित्य गवळी, आदित्य कोल्हे, आयशा अख्तर, ऐश्वर्या गुंजकर, आकाश जाधव, अमन पटेल, अमृता स्वामीनाथन, अनुष्का बोर्डे, फातेमा जोहरा, गगन मेहता, गौरव तायडे, गायत्री देशमुख, हेमंत राजहंस, साक्षी हिवाळे, इशान पेशकर, ईशिता गायकवाड, मेहन हिनहोरिया, मानव जैन, मीरा बर्वे, पल्लवी फारकडे, मलिहा पटेल, प्रभांजन पाटील, प्राजक्ता सिंगारे, प्रांजली वाडोदकर, प्रेक्षा अजमेरा, पूर्ती पाटील, रजवी सय्यद, रुद्रांश जगताप, ऋतुजा चौधरी, सागर मुके, साक्षी सिंग, सलोनी देव, संपन्न सोमवंशी, समृद्धी चौधरी, सार्थक परदेसी, श्रुती ढोके, वैभव बर्डे, वैष्णवी शेळके, विनीत धूत, विराज छाजेड, विराज अनारथे, यशराज घाडगे.

फोटो ओळ :

गुणवंत विद्यार्थ्यांसाेबत डॉ. संजय चोरडिया, डॉ. संतोष रंजलकर, मिलिंद पोटे, झुंबरलाल पगारिया.