शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

पारा ४२ अंशांवर गेल्याने जालनेकर त्रस्त

By admin | Updated: April 29, 2015 00:52 IST

जालना : शहरात यंदाच्या तापमानाचा उच्चांक मंगळवारी नोंदला गेला. पारा ४२ अंश सेल्सियसपर्यंत गेल्याने रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना कडक उन्हाचे चटके जाणवले.

जालना : शहरात यंदाच्या तापमानाचा उच्चांक मंगळवारी नोंदला गेला. पारा ४२ अंश सेल्सियसपर्यंत गेल्याने रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना कडक उन्हाचे चटके जाणवले. लग्नसराईत वऱ्हाडी मंडळींचे मात्र या उन्हामुळे मोठे हाल झाले.उन्हाळा सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता फारशी जाणवत नव्हती. एप्रिल महिन्याच्या १५ तारखेपर्यंत देखील पारा ३६ अंशापुढे सरकला नव्हता. अवकाळी पाऊस, गारपिट, सतत ढगाळ वातावरण यामुळे भर उन्हाळ्यातही पावसाळा असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या १२ दिवसांपासून मात्र तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सियस दरम्यान नोंदले जात होते. मंगळवारी सकाळपासूनच कडक ऊन जाणवू लागले. दुपारी ३ वाजता उन्हाचा पारा ४२ अंशावर पोहोचला. उन्हामुळे अनेकांनी घरी विश्रांती घेणे पसंत केले. परंतु ज्यांना कामानिमित्त बाहेर ये-जा करणे टाळणे अशक्य होते, त्यांनी रूमाल, गॉगल्सचा वापर करून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.नवीन मोंढ्यात दुपारी १ ते ४ या दरम्यान, कामगारांनी विश्रांती घेणे पसंत केले. या काळात मालाची आवकही झाली नाही. गर्दीची ठिकाणे वगळता शहरात अन्य रस्त्यांवर दुपारच्या वेळी शुकशुकाट होता. यंदा तापमानात प्रथमच वाढ झालेली दिसून आली. लग्नसराईमुळे शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. बाजारपेठेतही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. (प्रतिनिधी)२८ एप्रिल ही लग्नसराईतील दाट तिथी असल्याने आज शहरातील जवळपास सर्व मंगल कार्यालयांमध्ये लग्नसराईची धूम होती. वाढत्या उन्हामुळे लग्नसराईतील अबालवृद्धांचे मोठे हाल झाले. मात्र नवरदेवासमवेत निघालेल्या मिरवणुकांमध्ये तरूणांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले. ४वऱ्हाडी मंडळी या मिरवणुकीमध्ये जेथे सावली असेल, अशा ठिकाणी जाऊन थांबणे पसंत करीत होते. वृद्ध मंडळींनी अशा मिरवणुकीपासून स्वत:ला दूर ठेवत मंगल कार्यालयात थांबणे पसंत केल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी रिकाम्या पाणी पाऊच पडल्याचे चित्रही दिसून आले.कडक उन्हामुळे आज शहरातील विविध थंडपेयांच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी नेहमीपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. लग्नसराईमुळे परगावाहून शहरात आलेल्या पाहुण्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे बसस्थानक, रेल्वेस्थानक या परिसरातही ग्राहकांची गर्दी दिसून आली. उन्हाच्या कडाक्यातून सुटका म्हणून सायंकाळी मोतीबागेतही गर्दी दिसून आली.