शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पारा ४३ अंशांवर..

By admin | Updated: May 6, 2017 00:26 IST

जालना : शुक्रवारी तापमान ४३ अंश सेल्यिअस नोंदविले गेल्याने कडक ऊन व उकाड्यामुळे जालनेकरांची लाहीलाही झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता कायम आहे. शुक्रवारी तापमान ४३ अंश सेल्यिअस नोंदविले गेल्याने कडक ऊन व उकाड्यामुळे जालनेकरांची लाहीलाही झाली. जिल्ह्यात गत काही वर्षांपासून तापमानात कमालीची वाढ होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दोन ते तीन अंशांनी तापमान वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. शुक्रवारी जिल्ह्याचे सरासरी तापमान ४३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. वाढत्यामुळे उन्हामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अवकाळीमुळे उन्हाची तीव्रता कमी होईल, अशी शक्यता होती. मात्र उन्हाचा पारा वाढला आहे. उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने आबालवृद्धांचे हाल होत आहेत. तापमान ४३ अंश असले तरी याची तीव्रता ४६ अंशां सारखी भासत होती. दुपारी बारा वाजेपर्यंत चाळीस अंशांवर असलेले तापमान दुपारी तीन वाजता ४३ अंशांवर गेले. विविध संकेतस्थळांवर तापमान ४३ अंश दाखवित होते. अंबड, परतूर, मंठा ४२ तर भोकरदन, जाफराबाद व बदनापूर तालुक्यांत पार ४१ ते ४२ अंशांवर स्थिरावत होता. जिल्ह्याचे तापमान मात्र ४३ अंश दिसत होते. शुक्रवारी कडक उन्हामुळे शहरात दिवसभर सन्नाटा दिसून आला. लग्नतिथी असूनही दुपारनंतर बाजारपेठेतील गर्दी कमी झाली होती. उन्हाच्या तीव्रतेने जलसाठ्यांत झपाट्याने घट होत असल्याचे दिसून येते. कडक उन्हामुळे आठवडी बाजारातील गर्दी रोडावलेलीच आहे. उन्हामुळे लग्नसमारंभातील गर्दीवरही परिणाम झाल्याचे चित्र आहे. गतवर्षी याच दिवशी तापन ३९ ते ४० अंश होते. यंदा त्यात वाढ होऊन ते ४३ अंशांवर गेले आहे. शेतीमध्ये पीक नसले तरी फळबागा व भाजीपाल्यास वाढत्या तापमानाचा मोठा बसत आहे. अत्यल्प पाणी व उन्हाची तीव्रता यामुळे फळबागा वाळून जात असल्याचे शेतकरी सांगतात.