शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पारा ३६ वर ! फेब्रुवारीमध्येच बीडकरांच्या जिवाची लाही-लाही

By admin | Updated: February 23, 2016 00:32 IST

बीड : फेब्रुवारी महिना संपत आलेला असतानाच सूर्य आग ओकू लागला आहे. सोमवारी जिल्ह्यात ३६ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली.

बीड : फेब्रुवारी महिना संपत आलेला असतानाच सूर्य आग ओकू लागला आहे. सोमवारी जिल्ह्यात ३६ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली.पावसाळ्याचे चार महिने कोरडेठाक गेले. हिवाळ्याच्या मोसमातही फारशी थंडी जाणवली नाही. आता हिवाळा संपत नाही तोच उन्हाने डोके वर काढले आहे. त्यामुळे हिवताप, सर्दी-खोकला यासारखे आजार बळावत आहेत.सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत गेली. दुपारी सूर्य चांगलाच तळपत होता. अनेकांनी दुपारच्या वेळी घरात पंखे, कूलर आदींचा आश्रय घेणे पसंत केले, त्यामुळे रस्ते सूनसान झाले होते. शासकीय कार्यालयांमध्येही पंखे, कूलरची दुरुस्तीचे काम चालू होते. सोमवारी नोंदविलेले तापमान या महिन्यातील सर्वाधिक होते. गत आठवड्यापर्यंत किमान तापमान २०, तर कमाल तापमान २९ अंश सेल्सियसपर्यंत नोंदविले गेले. पारा वेगाने वर जाऊन किमान २३, तर कमाल ३६ अंश सेल्सियसवर स्थिरावला.दरम्यान, बसस्थानकासह बाजारपेठांमध्ये थंडपेयांना वाढती मागणी होती. उन्हात फिरताना नागरिकांनी डोक्यावर गमछे, टोप्या आदींचा आधार घेतला.येत्या काही दिवसांमध्ये पारा चाळीशी पार करण्याची शक्यता आहे. थंड पेय, पंखे, कूलर दुरूस्तीचे व्यवसाय जोमात आहेत. (प्रतिनिधी)