शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मर्कटलिलांनी वेरुळकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:01 IST

वन विभागाचे दुर्लक्ष : चावा घेतल्याने कर्मचारी जखमी

वेरूळ : मर्कटलिलांनी वेरुळकर त्रस्त झाले असून वन विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वेरूळ लेणीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सोमवारी लेणी कर्मचाऱ्याला लाल माकडाने चावा घेतल्याची घटना घडली.लेणी परिसरात काळ्या वानरांची संख्या शेकडोंच्या घरात असून त्यात दोन लाल माकडेही आहेत. काळ्या तोंडाच्या वानरांवर लाल माकडांचे वर्चस्व असल्याने त्यातून माकडांच्या टोळ्यात वारंवार भांडणे होतात. आलेले पर्यटक या माकडांना पाहून खाद्यपदार्थ देतात. त्यामुळे माकडांच्या टोळ्या पर्यटकाजवळील खाद्यपदार्थ हिसकावून घेण्याच्या घटना येथे तर नित्याच्याच झालेल्या आहेत.त्यात लेणी कर्मचारी शेख बशीर हे कामावर जात असताना लाल माकडाने त्यांच्यावर झडप मारून खाली पाडले व पायाला चावा घेऊन जखमी केले. जवळपास असलेल्या लोकांनी आरडाओरड केल्याने माकडाने तेथून पळ काढला. रविवारीही येथील व्यावसायिक भास्कर गाडगे यांनाही माकडाने चावा घेतला होता. शेख बशीर यांना जलद प्रतिसाद दलाचे राम माळी यांनी त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले.यासंदर्भात पोलीस प्रशासन आणि भारतीय पुरातत्व विभागाने पर्यटक आणि लेणी कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी वन विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून कळविले. परंतु आजपर्यंत वन विभागाने या माकडांचा बंदोबस्त केला नाही. त्यामुळे पर्यटक, कर्मचारी, व्यावसायिक मर्कट लिलांनी त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभागMonkeyमाकड