औरंगाबाद : रायपूर येथे नुकत्याच झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत औरंगाबादच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ प्लास्टिक्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (सिपेट) संस्थेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यात ४00 मीटर धावण्यात शिवाजी वाळुंजे याने सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत औरंगाबादसह अहमदाबाद, भोपाळ, रायपूर, चंद्रपूर, वलसाड अशा विविध केंद्रांतील खेळाडू सहभागी झाले होते.औरंगाबादचे पदक विजेते खेळाडू (मुले) : ४00 मी. धावणे : शिवाजी वाळुंजे (सुवर्ण), ८00 मी. धावणे : मोहंमद शोएब खान (रौप्य), २00 मी. धावणे : विकास चंदिले (कास्य), लांबउडी : रवींद्र वेताळ (रौप्य). मुली : १00 मी. धावणे : रविना गुप्ता (कास्य), २00 मी. धावणे : साक्षी अलुले (कास्य), लांबउडी : प्रतीक्षा भालके (रौप्य), गोळाफेक : कल्याणी खडके (कास्य). कर्मचारी पुरुष : लांबउडी : किरण कुमार कोळी (रौप्य), महिला : गोळाफेक : संतोषिनी मिश्रा (सुवर्ण), लांबउडी : पल्लवी सराईकर (रौप्यपदक). खेळाडूंना श्याम अंभोरे, संतोष सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. पदक विजेत्या खेळाडूंचे सिपेटचे संचालक मनोजकुमार मंडल, प्रवीण बच्छाव, एन. बी. श्रीकुमार, तुषार चौधरी यांनी अभिनंदन केले.
विभागीय क्रीडा स्पर्धेत वाळुंजेला सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:13 IST