शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

व्हीप डावलून सेना सदस्यांचे मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:18 IST

जिल्हा नियोजन समितीच्या १७ जागांसाठी बुधवारी झालेल्या मतदानात शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील १० सदस्यांनी पक्षाचा व्हीप डावलून मतदान प्रक्रियेत निर्भिडपणे भाग घेतला. विशेष म्हणजे, शिवसेनेने आपल्या १० सदस्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत मतदान करु नये, असा आदेश व्हीपद्वारे बजावला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेङ: जिल्हा नियोजन समितीच्या १७ जागांसाठी बुधवारी झालेल्या मतदानात शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील १० सदस्यांनी पक्षाचा व्हीप डावलून मतदान प्रक्रियेत निर्भिडपणे भाग घेतला. विशेष म्हणजे, शिवसेनेने आपल्या १० सदस्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत मतदान करु नये, असा आदेश व्हीपद्वारे बजावला होता.जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत ग्रामीण निर्वाचनक्षेत्र अर्थात जिल्हा परिषदेतून २८ सदस्यांची निवडणूक होती. यातील १७ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित ११ सदस्यांसाठी २७ सप्टेंबर रोजी मतदान झाले. या मतदानात शिवसेनेच्या १० सदस्यांनी सहभागी होऊ नये असा व्हीप पक्षाचे जिल्हाध्यक्ष भुजंग पाटील आणि बाबूराव कदम यांनी बजावला होता. वृत्तपत्राच्या माध्यमातून हा व्हीप काढण्यात आला होता. त्यात प्रवीण पाटील चिखलीकर, बबनराव बारसे, प्रणिताताई देवरे, गजानन गंगासागर, विजयकुमार बास्टेवाड, मारोती लोखंडे, भाग्यश्री साबणे, पद्मा सतपलवार, मोनाली पाटील आणि संगीता गायकवाड या सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या मतदानास गैरहजर राहण्याचे बजावण्यात आले होते. तसेच मतदान केल्यास कार्यवाहीचा इशाराही दिला होता. मात्र या इशाºयाला धुडकावून लावत सर्वच शिवसेना सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.निवडणुकीत मतदान करु नये ही भूमिका मान्य नसल्याचे या सदस्यांनी सांगितले. आम्ही सर्वांनीच मतदान केले असून आता कार्यवाही कुणावर करणार? असा सवालही उपस्थित केला. एकीकडे तुरुंगात असलेल्यांना मतदानासाठी बाहेर जाण्याची परवानगी दिली जाते. इथे मात्र चक्क मतदानाच्या अधिकारावरच गदा आणली जात आहे. ही बाब लोकशाही परंपरेला शोभणारी नसल्याचेही सदस्यांनी सांगितले.जिल्हा नियोजन समितीच्या ३५ जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. १९ सप्टेंबर हा उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. १९ रोजी ३५ पैकी १८ जागा बिनविरोध निवडल्या होत्या. उर्वरित १७ जागांसाठी बुधवारी मतदान घेण्यात आले. नांदेड शहरातील तीन मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. यात ग्रामीण निर्वाचनक्षेत्र अर्थात जिल्हा परिषदेसाठी १०० टक्के मतदान झाले. तर मोठे नागरी निर्वाचन क्षेत्रासाठी ६६.६७ टक्के मतदान झाले आणि लहान नागरी निर्वाचनक्षेत्र अर्थात नगरपालिका क्षेत्रासाठी ९६ टक्के मतदान झाले.या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलासाठी असलेल्या पाच जागांसाठी शोभाताई गोमारे, संगीता जाधव, अंकिता देशमुख, मोनाली पाटील, प्रणिता बंदखडके, संगीता मॅकलवाड आणि ललिता येलमगोंडे हे उमेदवार रिंगणात आहेत. तर सर्वसाधारण गटातील सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यात सूर्यकांत आरंडकर, प्रकाशराव कल्याणकर, प्रवीण चिखलीकर, समाधान जाधव, व्यंकटराव पाटील, मधुकर राठोड आणि मनोहर शिंदे या सात उमेदवारांचा समावेश आहे. नगर पालिका क्षेत्रातील अनु. जाती महिलांसाठी असलेल्या एका जागेसाठी अनिता कदम आणि वैशाली चौदंते यांच्यात लढत होत आहे. तर नागरिकांचा मागास प्रवर्गातील एका जागेसाठी चंद्रकांत गरुडकर आणि म. सरवर यांच्यात लढत झाली. सर्वसाधारण गटातून विठ्ठल कुडमुलवार आणि बाबूराव डोंब तर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून महानंदा पाटील, दीपाली मामीलवाड यांच्यात थेट लढत झाली. महापालिकेच्या दोन जागांसाठी चार जण रिंगणात आहेत. त्यात नागरिकांच्या मागासप्रवर्गातून अ.लतिफ, सुंदरलाल गुरखुदे यांच्यात तर सर्वसाधारण गटातून अशोक उमरेकर, उमेश चव्हाण यांच्यात सरळ लढत होत आहे.या निवडणुकीची मतमोजणी २८ सप्टेंंबर रोजी होणार आहे. निवडणुकीचे निकाल दुपारपर्यंत येतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पाटील यांनी दिली.